शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

सूनबार्इंऐवजी सासरेच झाले सभापती

By admin | Updated: April 8, 2017 23:13 IST

र्यंबकेश्वर : सभापती ज्योती राऊत यांना बाजूला ठेवून त्यांच्या सासऱ्यांनीच बैठकीची सूत्रे हाती घेऊन अधिकाऱ्यांना जेरीस आणल्याची चर्चा सुरू होती.

 त्र्यंबकेश्वर : सभापती ज्योती राऊत यांना बाजूला ठेवून त्यांच्या सासऱ्यांनीच बैठकीची सूत्रे हाती घेऊन अधिकाऱ्यांना जेरीस आणल्याचा अजब प्रकार त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या पहिल्याच आढावा बैठकीत पाहावयास मिळाल्याने दिवसभर याबाबत पंचायत समिती वर्तुळात चर्चा सुरू होती.त्र्यंबक पंचायत समितीची गुरुवारी सभापती ज्योती राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपसभापती रवींद्र भोये, सदस्य देवराम मौळे, मनाबाई भस्मा, मोतीराम दिवे, अलका झोले, जि. प. सदस्य रु पांजली माळेकर, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे आदि उपस्थित होते. सभागृहात सदस्यांच्या रांगेतच एक गृहस्थ बसलेले असल्याने प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी बुचकळ्यात पडले. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता ते गृहस्थ सभापती ज्योती राऊत यांचे सासरे लक्ष्मण राऊत असल्याचा खुलासा त्यांनी केला. पंचायत समितीशी कोणताही संबंध नसताना लक्ष्मण राऊत यांनी सुरुवातीपासूनच थेट चर्चेत भाग घेण्यास सुरुवात केल्याने प्रश्नांची उत्तरे नेमकी कुणाला द्यायची असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला. सभेपुढे येणाऱ्या प्रत्येक विषयाच्या चर्चेत सहभागी होऊन लक्ष्मण राऊत यांनी जणू काही आपणच सभापती असल्याच्या आविर्भावात संपूर्ण सभेची सूत्रेच आपल्या हाती घेतल्याचे दृश्य सभागृहात दिसत होते. विशेष म्हणजे सासरे बोलत असताना सूनबाई चक्क गप्प बसून असल्याचे दिसले. याप्रकारामुळे अधिकारी मात्र त्रस्त झाले. काहीवेळा विभागाशी संबंधित नसलेल्या बाबींविषयीही अधिकाऱ्यांना विचारणा होत असल्याने अधिकारी त्रस्त झाले. (वार्ताहर)