शिवजलक्रांती योजनेच्या कामांची पाहणी

By Admin | Updated: September 3, 2016 23:20 IST2016-09-03T23:19:49+5:302016-09-03T23:20:31+5:30

शिवजलक्रांती योजनेच्या कामांची पाहणी

Inspection of work of Shivjalakranti scheme | शिवजलक्रांती योजनेच्या कामांची पाहणी

शिवजलक्रांती योजनेच्या कामांची पाहणी

निफाड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मराठवाड्यात साकारलेल्या शिवजलक्रांती योजनेतून जालना जिल्ह्यात झालेली कामे व विविध समस्यांचा आढावा निफाडचे आमदार अनिल कदम यांनी एकदिवसीय दौऱ्यात घेतला. जालना जिल्ह्यातील अंबड व घनसांगवी या तालुक्यात माजी आमदार शिवाजी चोथे, जि. प. सदस्य उबाळे, शाखाप्रमुख गिरी यांच्यासह आमदार अनिल कदम यांनी पराडागाव व ताड-हातगाव येथे शिवजलक्र ांतीचा पाहणी दौरा केला.
त्यानंतर जालना जिल्ह्याधिकारी कार्यालयात ज्येष्ठ मंत्री सुभाष देसाई, नामदार अर्जुन खोतकर, खासदार प्रताप जाधव, आमदार खेडेकर, माजी आमदार संतोष सावरे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार अनिल कदम यांनी विविध समस्यांचा आढावा घेतला. पिकविमा, कर्ज पुनर्गठन, मोसंबी अनुदान यासह विद्युत कंपनीच्या समस्यांबाबत प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार कदम यांनी दिले. दौर्यावेळी आमदार कदम यांच्यासमवेत बाळासाहेब सरोदे, बापूसाहेब जाधव, खोडदे आदि उपस्थित होते.(वार्ताहर)

Web Title: Inspection of work of Shivjalakranti scheme