इंदिरानगर जुगार अड्ड्यावरील छाप्यात दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 17:00 IST2018-09-07T16:59:31+5:302018-09-07T17:00:00+5:30

इंदिरानगर : येथील शहीद भगतसिंगनगर वसाहतीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून रोख रकमेसह सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़

An inspection at the Indiranagar gambar base seized a plot of one and a half lakhs | इंदिरानगर जुगार अड्ड्यावरील छाप्यात दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

इंदिरानगर जुगार अड्ड्यावरील छाप्यात दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देभगतसिंगनगर वसाहतीतील अल्को मार्केटजवळील पत्र्याच्या शेड ; कल्याण मटका व जुगार

इंदिरानगर : येथील शहीद भगतसिंगनगर वसाहतीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून नऊ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले़ या जुगा-यांकडून रोख रकमेसह सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़

भगतसिंगनगर वसाहतीतील अल्को मार्केटजवळील पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका व जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शोध पथकास मिळाली होती़ त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक नागेश मोहिते, दत्तात्रेय पाळदे, अखलाक शेख, सागर पाटील, संदीप लांडे यांनी छापा टाकला असता संशयित अशोक सावळीराम पवार (५५), शंकर मोहनलाल जेसवाणी (५३), हिरालाल श्रीपाद मराठी (४३), भारत श्रावण दिघोळे (२८), राजेंद्र पंडितराव अहिरराव (५०), अशोक नारायण कुलकर्णी (६०), रावसाहेब शिवाजी कांबळे (७०), मोतीराम श्रीपत एडके (६०) हे जुगार खेळत होते़

पोलिसांनी या संशयितांकडून रोख रक्कम, दुचाकी वाहन, मोबाइल असा एक लाख ५० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयितांवर जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: An inspection at the Indiranagar gambar base seized a plot of one and a half lakhs