शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जायबंदी विद्यार्थ्याने आयसीयूतून दिला पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 1:02 AM

दहावीची परीक्षा देत असतानाच तो नेमका जिन्यावरून पडला आणि जखमी झाला. नाशिकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आली.

नाशिक : दहावीची परीक्षा देत असतानाच तो नेमका जिन्यावरून पडला आणि जखमी झाला. नाशिकच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आली. परंतु त्याची जिद्द आणि बोर्डाची साथ यामुळे त्यानी भूगोलाचा अखेरचा पेपर नाशिकच्या एका रुग्णालयातून दिले.नाशिक जिल्ह्यातील ओझर येथील एचएएल हायस्कूलचा विद्यार्थी प्रणव माळी हा नियमितपणे दहावीचे पेपर देत असताना गुरुवारी (दि.२१) अचानक जिन्यावरून पडला. त्याचे नाक फॅक्चर झाले तसेच हाता पायाला लागल्याने त्याला नाशिकमधील पंचवटी भागातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि ४८ तास त्याला अतिदक्षता विभागातच ठेवावे लागेल असे सांगण्यात आले. त्यामुळे पालकांची धावपळ उडाली. शाळेत मुख्याध्यापकांशी चर्चा केली. मुलाचा अभ्यास झाला आहे. परंतु एक पेपर देता आला नाही तर हे सत्र वाया जाईल त्यामुळे त्यांनी महाराष्टÑ राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्या नाशिक बोर्डाचे सचिव नितीन उपासनी यांच्याशी संपर्क साधला. मुलाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ देऊ यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. प्रणव माळीची जिद्द तसेच पालक आणि मुख्याध्यापकांची इच्छा बघून उपासनी यांनी त्याला सहकार्य करण्याचे ठरविले आणि आयसीयूमध्ये परीक्षा घेण्याची तयारी केली.त्यानुसार आज सकाळी ओझरवरून त्या मुलाचा बारकोड असलेली उत्तरपत्रिका मागून घेण्यात आली. पंचवटीतील स्वामी नारायण शाळेतून उत्तरपत्रिका घेण्यात आली आणि १० वाजून ५० मिनिटांनी प्रणवला देण्यात आली. एक सुपरवायझरही आयसीयूत नियुक्त करण्यात आला आणि एक वाजता त्याचा पेपर घेऊन तो नितीन उपासनी यांनी सीलबंद करून पुन्हा परीक्षा केंद्राकडे पाठवून दिला. त्यामुळे आयसीयूमध्ये असूनही त्याला परीक्षा देता आल्याचे समाधान मिळाले.प्रणव आणि त्याच्या कुटुंबीयांची परीक्षा देण्यासाठी धडपड बघून सहकार्य केले. विशेषत: त्याला रायटर देण्याची तयारी केली होती, परंतु त्याने स्वत:च पेपर लिहिण्याचा हट्ट धरला. त्यामुळेच बोर्डाने सकारात्मक भावनेने मदत केली.  - नितीन उपासनी,  सचिव, नाशिक बोर्ड

टॅग्स :examपरीक्षाhospitalहॉस्पिटल