कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 11:03 PM2020-01-25T23:03:00+5:302020-01-26T00:13:53+5:30

मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जात आहे. सातत्याच्या दुष्काळानंतर यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. फवारणी करून कांदा पीक वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Influence of Karpa Disease on Onion | कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

googlenewsNext
ठळक मुद्देमालेगाव । शेतकऱ्यांकडून महागड्या औषधांची फवारणी; खर्चात वाढ

वडनेर : मालेगाव तालुक्यातील काटवण परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जात आहे. सातत्याच्या दुष्काळानंतर यावर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढलेला दिसून येत आहे. मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. फवारणी करून कांदा पीक वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कृषी विभागाच्या वतीने शेतकºयांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असताना विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे शेतकºयांनी सांगितले आहे. वडनेरसह काटवण परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड सुरू आहे. अवघ्या तीन ते चार महिन्यात पीक हाती येत असल्याने हुकमी पीक म्हणून कांद्याकडे पाहिले जाते. परंतु अधूनमधून बदलणाºया वातावरणामुळे कांद्यावर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. यावर्षी कांद्याला चांगला बाजारभाव असल्याने सगळेच शेतकरी कांदा लागवडीकडे वळला आहे. मध्येच मोठ्या प्रमाणात रोपाचा तुटवडा जाणवला. अवकाळी व ढगाळ वातावरणामुळे कांदा रोपे खराब झाली होती. यामुळे शेतकºयांनी रोपे विकत घेऊन कांदा लागवडीवर भर दिला. तालुक्यात अद्यापही कांदा लागवड सुरू आहे. यातच निसर्गाचा लहरीपणा बदलते हवामान अडचणीत आणणारे ठरत आहे.
सुरुवातीपासून कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली गेली; परंतु काही दिवसांपासून बदललेले वातावरण यामुळे नवीन जोमात आलेल्या कांदा पिकावर मावा, तुडतुडे, पिवळेपणा, गेंडा वळणे अशी लक्षणे दिसून येत आहेत. मालेगाव तालुक्यातील सावतावाडी, वडनेर परिसरात करपा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सातत्याच्या दुष्काळाचा सामना केल्यानंतर यंदा चांगले पर्जन्यमान तसेच कांद्याला चांगला दर मिळत असल्याने ‘अच्छे दिन’ची आशा बाळगत शेतकºयांनी कांदा लागवडीवर भर दिला आहे. यातच रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत आणणारा ठरत आहे. कृषी विभागाने शेतकºयांना करपा रोगावर उपाययोजना करण्यासंदर्भात योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

कांदा लागवडीत झाली वाढ
यंदा कांद्याला विक्रमी दर मिळाल्यामुळे कसमादे परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जात आहे. एकर हुकमी नगदी पीक समजल्या जाणाºया कांद्याचे कसमादे हे माहेरघर आहे. मालेगाव तालुक्यातील माळमाथा व काटवन भागात कपाशी हे प्रमुख पीक घेतले जाते. मात्र यंदा पाऊस समाधानकारक झाल्यामुळे नदी-नाले वाहत आहेत. तर विहिरींच्या जलपातळीत कमालीची वाढ झाली आहे. कोरडवाहू क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जात आहे. आगामी काळात कांद्याला दर मिळेल, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकºयांकडून केली जात आहे. महागडे ओळ्या आणून कांद्याची लागवड केली जात आहे. मात्र बदलत्या वातावरणाचा कांदा पिकावर परिणाम जाणवू लागला आहे.

Web Title: Influence of Karpa Disease on Onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.