शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक वसाहत बनली डंपिंग ग्राउंड

By admin | Updated: August 24, 2016 01:42 IST

ठिकठिकाणी कचरा : महापालिका-एमआयडीसीचे दुर्लक्ष; उद्योजक संघटनांचे मौन

गोकुळ सोनवणे ल्ल सातपूरमहानगरातील बांधकामांचा मलबा, घरातील बिनकामाचे साहित्य, घनकचरा सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्याच्या कडेला व मोकळ्या भूखंडांवर सर्रास टाकला जात आहे. त्यामुळे ठिकठिकाणी डंपिंग ग्राउंड तयार झाले आहेत. महानगरपालिका आणि एमआयडीसी यांच्या वादामुळेच औद्योगिक क्षेत्र या डंपिंग ग्राउंडच्या विळख्यात सापडले असल्याचा आरोप औद्योगिक संघटनांकडून केला जात आहे.शहरात ठिकठिकाणी जी काही बांधकामे सुरू आहेत तेथील बांधकामाचा मलबा, घनकचरा, ओला घनकचरा, प्लॅस्टिकचा कचरा औद्योगिक वसाहतीतील मोकळ्या भूखंडांवर आणि रस्त्याच्या कडेला सर्रास टाकला जात आहे. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. शहरातील बांधकामाच्या मलब्याची विल्हेवाट अनधिकृतपणे लावली जात आहे. त्याचा परिणाम डंपिंग ग्राउंडमध्ये होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सातपूर-अंबड येथील औद्योगिक वसाहती या कचऱ्याच्या विळख्यात सापडल्या आहेत. हा कचरा रोखायचा कोणी, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण महानगरपालिका आणि एमआयडीसी यांना लक्ष देण्यास वेळ मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे.सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील या डंपिंग ग्राउंडसदृश कचऱ्याच्या ढिगांमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. मोकाट जनावरे या ठिकाणी मुक्तपणे वावरतात. कचऱ्याच्या ठिकाणी अवैध धंदे बिनधास्त चालतात. रस्त्याने जाणाऱ्या कामगारांना अडवून त्यांची लूटमार केली जाते. या डंपिंग ग्राउंडमुळे औद्योगिक वसाहतीचा विद्रुप चेहरा बाहेरील लोकांना पहावयास मिळत आहे. उद्योजकांचे नेतृत्व करणाऱ्या औद्योगिक संघटनादेखील मूग गिळून बसल्या आहेत.