शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

साधुग्रामच्या सुरक्षेची वाढली डोकेदुखी

By admin | Updated: July 1, 2015 23:51 IST

चोऱ्यांमुळे कंत्राटदार हैराण : सेक्टर एकमध्ये आगंतुकांकडून अस्वच्छता, दरवाजे गायब

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनात उभारण्यात येणाऱ्या साधुग्रामच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता महापालिकेला सतावू लागला असून साधुग्राममधील शौचालयांचे दरवाजे, पत्रे तसेच नळ चोरीस जात असल्याने कंत्राटदारही हैराण झाले आहेत. सेक्टर एकमध्ये प्रामुख्याने तीनही आखाड्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येणार असल्याने लवकरात लवकर आखाड्यांच्या ताब्यात जागा देण्यासाठी महापालिकेने आता कंबर कसली असून प्लॉट वाटपानंतर सुरक्षिततेची जबाबदारी काहीशी कमी होणार आहे. महापालिकेमार्फत तपोवनासह आसपासच्या सुमारे ३२५ एकर जागेवर साधुग्रामच्या उभारणीचे काम वेगात सुरू आहे. महापालिकेच्या मालकीच्या ५४ एकर जागेत सेक्टर एकमध्ये प्रामुख्याने तीनही आखाड्यांच्या निवासाची व्यवस्था राहणार असल्याने सेक्टर एकचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. याठिकाणी महापालिकेने शौचालय व स्नानगृहांचे कामही पूर्ण केलेले आहे. तीन आठवड्यांपूर्वी झालेल्या पावसामुळे सेक्टर २ व ३ मधील शौचालय-स्नानगृहाचे पत्रे उडाले होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले होते; मात्र सेक्टर एकला फारशी झळ पोहोचली नव्हती. त्याबाबत पालकमंत्र्यांसह जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु आता पूर्णत्वाला आलेल्या सेक्टर एकमध्ये उभारण्यात आलेल्या शौचालय-स्नानगृहासह नळफिटिंग्ज, वीजफिटिंग्ज यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कंत्राटदारासह महापालिकेला सतावू लागला आहे. सिंहस्थाला अद्याप दीड महिना शिल्लक असताना अनेक पोटभरू साधूच्या वेशातील भिक्षुक शहरात दाखल होत असून काहींनी थेट साधुग्राममध्येच बिऱ्हाड मांडले आहे. सेक्टर वनमध्ये आगंतुकांकडून शौचालयांमध्ये घाण केली जात असल्याने अस्वच्छता दिसून येते. याशिवाय चोरट्यांनीही शौचालये-स्नानगृहांच्या शेडचे पत्रे आणि लोखंडी दरवाजे तसेच नळफिटिंग्ज, पाईप यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कंत्राटदारासह महापालिकेची डोकेदुखी वाढली आहे. अनेक ठिकाणी दरवाजे अर्धवट स्थितीत तोडलेले असून शौचालयांतील भांड्यांचेही नुकसान करून ठेवले आहे. साधुग्रामचा एकदाचा ताबा आखाड्यांकडे सोपविल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची बव्हंशी जबाबदारी कमी होणार असल्याने महापालिकेला आता प्लॉट वाटपांची प्रतीक्षा लागून आहे. येत्या ५ किंवा ६ जुलैला आखाडा परिषदेची बैठक होण्याची शक्यता असून त्यात प्लॉट वाटपासंबंधी निर्णय अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)