शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा निचरा होण्यासाठी चेंबर्सची संख्या वाढविणार

By admin | Updated: July 16, 2017 00:12 IST

नाशिक : शहरात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने आता पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी चेंबर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शुक्रवारी (दि.१४) शहरात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यांमध्ये पाणी साचल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने आता पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी चेंबर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असून, काही ठिकाणी दुभाजकांचीही उंची कमी करण्याचे प्रयत्न असल्याचे शहर अभियंता उत्तम पवार यांनी सांगितले.  शुक्रवारी शहरात झालेल्या पावसाने पुन्हा एकदा नाशिककरांची दाणादाण उडविली. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले. त्र्यंबकरोडवरील सावरकर जलतरण तलावाबाहेर तर पाण्याचा आणखी एक तलावच तयार झाला होता, तर सातपूर विभागीय कार्यालयासमोरच मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने शिवसेनेने ‘फडणवीस वॉटर पार्क’ असे संबोधित उपरोधिक आंदोलन केले होते. या साऱ्या प्रकाराबाबत शहर अभियंता उत्तम पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, शुक्रवारी पावसाचा जोर वाढल्यानंतर महापालिकेने प्रभागनिहाय नेमलेल्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी चेंबरमधील घाण-कचरा हटविण्याचे काम केले.   १६९ ठिकाणी १३३ कर्मचारी व १४ जेसीबी व १५ ट्रॅक्टरच्या मदतीने विविध स्वरूपाची कामे करण्यात आली. त्यात प्रामुख्याने, चेंबरवर अडकलेली घाण हटविणे, ढापे उघडून पाण्याचा निचरा करणे, चोकअप काढणे, संरक्षित भिंतींना छिद्र पाडून पाण्याचा निचरा करणे, दुभाजकही कट करून पाण्याला वाट मोकळी करून देणे आदी कामांचा समावेश होता. पावसाचे पाणी साचणाऱ्या भागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाययोजना केल्या जात असून, प्रामुख्याने, पाण्याचा निचरा करणारे कॅचपीट अर्थात चेंबर्सची संख्या वाढविली जाणार आहे. दुभाजकांची उंची कमी करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.