चांदवड येथे उत्स्फूर्त बंद

By Admin | Updated: October 13, 2016 22:43 IST2016-10-13T22:39:08+5:302016-10-13T22:43:14+5:30

देवळा घटनेचा निषेध : मूकमोर्चा शांततेत, तहसीलदारांना निवेदन

Improved shutdown at Chandwad | चांदवड येथे उत्स्फूर्त बंद

चांदवड येथे उत्स्फूर्त बंद

चांदवड : येथे देवळ्यातील घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी बंद पाळण्यात येऊन मूकमोर्चा काढून निषेधाचे निवेदन पोलीस स्टेशनला देण्यात आले. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार आज चांदवड शहर बंद ठेवण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मूकमोर्चाने श्रीरामरोड, शिवाजी चौक, सोमवार पेठमार्गे आठवडे बाजारातून चांदवड पोलीस स्टेशनच्या आवारात मोर्चा आला. तेथे पांडुरंग भडांगे, राजाभाऊ अहिरे, मनोहर बनकर यांची भाषणे झाली. यावेळी तहसीलदार शरद मंडलिक, पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांना निवेदन देण्यात आले. संबंधित समाज-कंटकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर रवींद्र अहिरे, पांडुरंग भडांगे, रवींद्र जाधव, सिद्धार्थ केदारे, विजय जाधव, अ‍ॅड. विकास जाधव, राजेंद्र गांगुर्डे, प्रदीप बनकर, माया निरभवणे, मनोहर बनकर, उमेश जाधव आदिंच्या सह्या आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, जगन्नाथ राऊत, रिजवान घासी, अल्ताफ तांबोळी, दीपक शिरसाठ, अंकुर कासलीवाल आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला. (वार्ताहर)

Web Title: Improved shutdown at Chandwad