वसाका, विठेवाडी परिसरात अवैध वाळू साठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 10:08 PM2021-12-29T22:08:07+5:302021-12-29T22:08:42+5:30

लोहोणेर : वसाका व विठेवाडी परिसरात सध्या अवैध वाळू वाहतुकीने उच्छाद मांडला असून, वसाका परिसरात दिवसेंदिवस अवैध वाळूचे साठे वाढत चालले आहेत. या प्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Illegal sand deposits in Vasaka, Vithewadi area | वसाका, विठेवाडी परिसरात अवैध वाळू साठे

वसाका, विठेवाडी परिसरात अवैध वाळू साठे

googlenewsNext
ठळक मुद्देसध्या वसाका परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी

लोहोणेर : वसाका व विठेवाडी परिसरात सध्या अवैध वाळू वाहतुकीने उच्छाद मांडला असून, वसाका परिसरात दिवसेंदिवस अवैध वाळूचे साठे वाढत चालले आहेत. या प्रकरणी शासकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सध्या वसाका परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी होत असून, कारखाना कार्यस्थळालगत निर्जन जागेवर अवैधरीत्या उपसा होत असलेल्या वाळूचे ठिय्ये टाकलेले आढळून येत आहेत. याबाबत महसूल अधिकाऱ्यांच्या कानावर काही सुजाण नागरिकांनी सदर घटना टाकल्यानंतरही वाळू उपसा सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून या अवैध वाळू चोरीला आळा घालावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Illegal sand deposits in Vasaka, Vithewadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.