भोंदूबाबा अशोक खरातविरोधोत सोमवारी आणखी एका पीडितेने तक्रार दिली असून चांगलं करिअर घडवून देण्याचं आमिष दाखवत संमोहनाच्या माध्यमातून आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. त्यानंतर ठार मारण्याच्या धमक्या देत गप्प ठेवण्यात आलं, तर काही काळानंतर मोबाईलवर अश्लील व्हिडीओ पाठवून पुन्हा ब्लॅकमेल करत अत्याचार सुरू ठेवल्याचा गंभीर आरोप या तरुणीने केला आहे.
पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, २०२१ मध्ये ती आपल्या आई-वडिलांसह सिन्नर तालुक्यातील ईशानेश्वर महादेव मंदिर येथे दर्शनासाठी गेली होती. त्या ठिकाणी संबंधित आरोपीबाबत 'दैवी शक्ती' असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. विविध अडचणींवर तो उपाय सुचवतो, असा समज असल्यामुळे कुटुंबीयांनी नाशिकमधील त्याच्या कार्यालयात भेटी देण्यास सुरुवात केली.
अंधश्रद्धेचा बाजार! खरात बाबाच्या वर होता आणखी एक भोंदूबाबा; गंडादोरा देणाऱ्याचाही शोध सुरू
घर बांधकामासंदर्भात मार्गदर्शन घेण्यासाठी सुरुवातीला ते आरोपीला भेटले असता, त्याने जागा अशुभ असल्याचं सांगितलं. त्यानंतर वेगवेगळ्या बहाण्याने आपल्याला जाळ्यात ओढण्यात आल्याचं म्हटलं आहे. अशाप्रकारे आरोपीने वारंवार आपल्यावर अत्याचार केल्याचं तरुणीने म्हटलं आहे.
महादेवाचा अवतार असल्याचं सांगून अत्याचार...
जुलै २०२४ मध्ये पीडिता आपल्या आई-वडिलांसह आरोपीकडे गेली असता, आरोपीने तिला एकटीला आत बोलावलं. फिर्यादीनुसार, त्याने तिला पाणी दिलं ज्यामध्ये गुंगीकारक पदार्थ मिसळलेला असल्याचा संशय आहे. ते पाणी पिल्यानंतर तिची अवस्था बदलली आणि आरोपीने संमोहनासारख्या प्रकाराने तिच्यावर नियंत्रण मिळवलं. यानंतर आरोपीने स्वतःला 'महादेवाचा अवतार असल्याचे सांगत तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
दैवी शक्ती, खोलीत पवित्र आत्मा, तीर्थ, पूजा...; महिलांना 'असं' जाळ्यात अडकवायचा अशोक खरात
"मी तुझं करिअर घडवेन" असं सांगून विश्वास संपादन केला, तर विरोध केल्यास तुझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणेन व कुटुंब उद्ध्वस्त करेन, अशी भीती दाखवत तिला धमकावलं. फिर्यादीनुसार, जुलै २०२४ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत आरोपीने अशा प्रकारे अत्याचार केले. सततच्या धमक्यांमुळे पीडिता बराच काळ गप्प राहिली.
Video - "चिखलफेक करणारी विकृती..."; रुपाली चाकणकरांचं सडेतोड उत्तर; बोटावरच्या जखमेचं 'सत्य'
व्हिडीओ पाठवून ब्लॅकमेलिंग...
यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये पीडितेला एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आरोपीसोबतचा अश्लील व्हिडीओ पाठवण्यात आला. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिने ही बाब आपल्या आई-वडिलांना सांगितली. आरोपीला विचारणा केली असता, त्याने हा व्हिडीओ 'एआयद्वारे तयार केलेला' असल्याचा दावा करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.
Web Summary : Another woman accuses Ashok Kharat of rape under hypnosis, promising career advancement. He allegedly threatened her family and later blackmailed her with obscene videos, continuing the abuse. The victim initially stayed silent due to fear.
Web Summary : एक और महिला ने अशोक खरात पर सम्मोहन के तहत बलात्कार करने का आरोप लगाया, करियर में उन्नति का वादा किया। कथित तौर पर उसने उसके परिवार को धमकी दी और बाद में अश्लील वीडियो के साथ ब्लैकमेल किया, जिससे दुर्व्यवहार जारी रहा। पीड़िता डर के कारण चुप रही।