‘एस्क्रो’मध्ये होणार साडेनऊ कोटी जमा

By Admin | Updated: January 20, 2017 00:52 IST2017-01-20T00:52:26+5:302017-01-20T00:52:38+5:30

मैत्रेय प्रकरण : सहा कोटी ६७ लाखांचे वाटप

A hundred crore deposits will be made in Escrow | ‘एस्क्रो’मध्ये होणार साडेनऊ कोटी जमा

‘एस्क्रो’मध्ये होणार साडेनऊ कोटी जमा

नाशिक : मैत्रेय गुंतवणूकदारांना ठेवींच्या रकमेचे वाटप ‘एस्क्रो’ खात्यामधून सुरू आहे. अद्याप ८ हजार ६६४ ठेवीदारांना सहा कोटी ६७ लाख २८ हजार ७२० रुपयांचे वाटप पोलिसांनी केले आहे. सध्या एस्क्रोमध्ये एक कोटी ४२ लाख रुपये शिल्लक असून, जानेवारीअखेरपर्यंत साडेनऊ कोटी रुपयांची भर ‘एस्क्रो’मध्ये पडणार आहे.
न्यायालयाच्या आदेशान्वये मैत्रेय कंपनीच्या नाशिक जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांना त्यांची देय रक्कम थेट बॅँक खात्यात वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सरकारवाडा पोलिसांनी कार्यवाही सुरू करत ठेवीदारांचे अर्ज मागवून यादी तयार केली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली तपास समितीकडून कामकाज करून अद्याप पाच महिन्यांत आठ हजार सहाशे ठेवीदारांना सहा कोटी ६७ लाख २८ हजार रुपयांचे रक्कम वाटप करण्यात पोलिसांना यश आले आहे. एकूणच मागील पाच महिन्यांपासून सातत्याने मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना त्यांची देय रक्कम वाटप करण्याची कार्यवाही सुरू आहे. यासाठी पोलिसांकडून ठेवीदारांना ‘कॉल’ करून त्यांना गुंतवणूकदार असल्याचे पुरावे घेऊन बोलविले जाते. त्यानंतर खात्यात रक्कम वर्ग केली जाते, असे कोल्हे यांनी सांगितले. जानेवारी अखेर मैत्रेयकडून साडेनऊ कोटी रुपयांचा भरणा निश्चित होणार असल्याचा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: A hundred crore deposits will be made in Escrow