नाशिकमध्ये भर बाजारपेठेत दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2021 18:04 IST2021-08-19T17:45:31+5:302021-08-19T18:04:10+5:30
पावसाच्या संततधार अन् बघ्यांची गर्दी यामुळे आग विझवताना अडचणी निर्माण होत असून या भागात धुराचे प्रचंड लोट उठले आहेत. (fire broke out at a shop in Nashik)

नाशिकमध्ये भर बाजारपेठेत दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल
नाशिक: शहरातील मध्यवर्ती परिसरात असलेल्या एमजीरोड भागातील जाधव मार्केट, या व्यापारी संकुलाच्या मागे असलेल्या एका दुकानाला शॉर्टसर्किट होऊन मोठी आग लागली आहे. अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी पोहोचले असून जवानांकडून आग विझविण्याचे काम सुरू आहे.
नाशिकमध्ये भर बाजारपेठेत दुकानाला भीषण आग, अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल pic.twitter.com/MZWNWuBvOn
— Lokmat (@MiLOKMAT) August 19, 2021
पावसाच्या संततधार अन् बघ्यांची गर्दी यामुळे आग विझवताना अडचणी निर्माण होत असून या भागात धुराचे प्रचंड लोट उठले आहेत. जाधव मार्केट हा बाजारपेठेचा परिसर असून शहराचा मध्यवर्ती भाग आहे.