नाशिककरांना भरतेय हुडहुडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:39 IST2021-02-05T05:39:08+5:302021-02-05T05:39:08+5:30

गेल्या गुरुवारी (दि.२१) पहाटे अचानकपणे नागरिकांना थंडीचा कडाका जाणवला होता. शहरात किमान तापमानाचा पारा थेट १४ अंशांवरून ११.४ अंशांपर्यंत ...

Hudhudi filling Nashik residents | नाशिककरांना भरतेय हुडहुडी

नाशिककरांना भरतेय हुडहुडी

गेल्या गुरुवारी (दि.२१) पहाटे अचानकपणे नागरिकांना थंडीचा कडाका जाणवला होता. शहरात किमान तापमानाचा पारा थेट १४ अंशांवरून ११.४ अंशांपर्यंत खाली घसरल्याची नोंद हवामान केंद्राकडून त्यादिवशी करण्यात आली ही सर्वाधिक नीचांकी नोंद ठरली होती. त्यानंतर पुन्हा पारा पुन्हा दोन दिवस १४ अंशांपर्यंत वर सरकला होता; मात्र, साेमवारी पुन्हा १०.४ अंशांपर्यंत खाली घसरल्याने थंडीचे शहरात जोरदार पुनरागमन झाले आहे.

२० तारखेनंतर नाशिककरांना थंडीची तीव्रता जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेला होता. या

मागील १० वर्षांमध्ये जानेवारीत नाशकात मोठ्या प्रमाणात किमान तापमानाचा पारा घसरलेला दिसून येतो. यावर्षी लहरी निसर्गामुळे जानेवारीचा पंधरवडा उलटूनही थंडीची तीव्रता वाढल्याचा अनुभव नाशिककरांना येत नव्हता; मात्र महिन्याच्या अखेरचा आठवडा सुरू होत असताना आता पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. हळूहळू दिवसा व रात्रीसुद्धा आकाश निरभ्र राहण्यास सुरुवात होऊ लागल्याने किमान तापमानात आता घट होत आहे. प्रजासत्ताक दिनानंतर पुढील काही दिवस शहरात थंडीचा कडाका अनुभवयास येऊ शकतो. किमान तापमानाचा पारा ५ अंशांपर्यंतही घसरण्याची शक्यता हवामान निरीक्षण केंद्राचे प्रमुख सुनील काळभोर यांनी व्यक्त केली आहे.

---इन्फो---

उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव

उत्तरेकडून येणारे वारे हे थंड असून, या वाऱ्यांचा वेग हा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दिल्लीमार्गे मध्यप्रदेश व महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या शीतलहरींचा प्रभाव आता हवामानावर होताना दिसत आहे. उत्तरेचे थंड वारे आणि रात्रीच्या सुमारास दक्षिण-पूर्वेकडील वाहणारे वारे यामुळे थंडीची तीव्रता येत्या काही दिवसांत उत्तर महाराष्ट्रात वाढणार आहे. दिल्लीमध्ये थंडीची लाट आली असून किमान तापमान ४ अंशांपर्यंत खाली घसरले आहे. यामुळे राज्यातसुद्धा थंडीची तीव्रता आता वाढणार असून उत्तर महाराष्ट्र अधिक गारठला जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Web Title: Hudhudi filling Nashik residents