शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषित गोदावरीत स्नान तरी कसे करावे

By admin | Updated: February 9, 2015 01:47 IST

प्रदूषित गोदावरीत स्नान तरी कसे करावे

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत देवेंद्र फडणवीस सरकार प्रचंड निष्क्रिय ठरले आहे. सिंहस्थ कामाचे कोणतेही नियोजन नाही असा आरोप करीत गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी एक इंचही काम झाले नसल्याचा आरोप करीत त्र्यंबकेश्वर येथील आखाड्यांच्या महंतांनी नाशिकमध्ये कुंभमेळा का घ्यावा? आणि प्रदूषित गोदावरीत स्नान तरी कसे करावे असा प्रश्नही उपस्थित केला आहे. सिंहस्थ कामासाठी मंजूर झालेल्या २३८० करोडमधून दहा करोडदेखील त्र्यंबकेश्वरला खर्च झाले नाहीत असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. उत्तर प्रदेश आणि अलाहाबाद येथे भरणाऱ्या कुंभमेळ्याबाबत तेथील राज्य सरकारांकडून ज्या तत्परतेने नियोजन केले जाते तशी तत्परता महाराष्ट्र शासनामध्ये नसल्याचा आरोप अखिल भारतीय दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष सागरानंद आणि श्री निरंजनी आखाड्याचे राष्ट्रीय सचिव नरेंद्रगिरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत केला. गोदावरीची स्वच्छता आणि घाट सुशोभिकरण्याबाबत कोणतेही नियोजन राज्य शासनाने केलेले नाही. गोदावरीतील सांडपाण्यामुळे पात्र पूर्णपणे प्रदूषित झाले आहे. पाण्यात दोन-दोन इंचांपर्यंतची किडे पडले आहेत. घाण, चिखल आणि दुर्गंधीयुक्त पाण्यातच कुंभ होणार असेल, तर गोदावरीत स्नान करू नका, असे साधुंना सागावे लागेल, असा इशारा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महंत हरिगिरी यांनी दिला.शहरातील सर्व सांडपाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले आहे. वास्तविक त्र्यंबकेश्वर ते नाशिक अशी सुमारे २० किलोमीटर स्वतंत्र सांडपाणी वाहणारी पाइपलाइन शहराबाहेर सोडण्याबाबत आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. परंतु याबाबत सरकारकडून कोणतेही उत्तर दिले जात नाही. सिंहस्थ नियोजनात त्र्यंबकेश्वरच्या कोणत्याही आखाड्याला विश्वासात घेतले जात नसल्याचाही आरोप हरिगिरी महाराज यांनी केला. कुंभमेळ्याचे पावित्र्य राखले जाणार नसेल आणि धार्मिक महत्त्व आबाधिक ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून कोणतीही उपाययोजना होणार नसले तर यंदाचा कुंभमेळा केवळ म्हणजे केवळ पर्यटनच आहे का? असाही सवाल महंत हरिगिरीजी महाराज यांनी उपस्थित केला.