शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

कशा कशाची चौकशी करणार?

By admin | Updated: January 23, 2016 23:57 IST

जयंत जाधव यांचा राम शिंदे यांना सवाल

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी धार्मिक पर्यटन व नाशिकच्या विकासासाठी अनेक प्रकल्प नाशिकमध्ये साकारले असून, पर्यटन राज्यमंत्री प्रा. राम शिंदे हे कशा कशाची चौकशी करणार, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी बोट क्लबचे उद्घाटन झालेले असताना बोट क्लब का सुरू होऊ शकला नाही याचा खुलासाही शिंदे यांनी करावा, असे आव्हानही त्यांनी दिले आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या शिंदे यांनी गंगापूर धरणातील बोट क्लबच्या बोटींच्या खरेदीची चौकशी करण्याचे सुतोवाच केले होते त्यावर आमदार जाधव यांनी प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी विमानतळ, कलाग्राम व पर्यटन वृद्धीसाठी शेकडो प्रकल्प साकारले आहेत या प्रकल्पांची चौकशी अद्याप बाकी असून, त्यांचीही चौकशी करणार का? असा सवाल करून शिंदे यांनी अगोदर बोटक्लब पाहावा व मगच चौकशींची घोषणा करावी, असे आव्हानही जाधव यांनी दिले. भुजबळ यांनी केलेली विकासकामे सरकारच्या डोळ्यात खूपत असून, त्यांनी साकारलेल्या प्रकल्पांच्या चौकशा केल्या तर सरकारची अख्खी कारकीर्द चौकशांमध्ये संपून जाईल, असा दावाही जाधव यांनी केला आहे.