शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यांत ११ हजार घरकुले कशी बांधणार

By admin | Updated: November 13, 2016 00:58 IST

जिल्हा परिषदेपुढे पेच : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना नोटीस?

नाशिक : जिल्हा परिषदेला पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात थोडेथोडके नव्हे तर तब्बल ११ हजार ७५१ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. नोव्हेंबर सुरू होऊन एकाही घरकुलाचा ‘पाया’ रचला न गेल्याने विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची चर्चा आहे.विभागीय आयुक्तांच्या कारणे दाखवा नोटिसीच्या ‘बूस्टर डोस’ नंतर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसह सर्वच गटविकास अधिकाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेला गती देण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नव्हे तर यापूर्वीच जिल्ह्णातील सर्व शाखा अभियंता व उपअभियंता यांना आलटून-पालटून तालुक्यांमध्ये सर्वेक्षण व लाभार्थी तपासणीचे कामही दिले होते. ते सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, लाभार्थींची यादीही अंतिम करण्यात आल्याची चर्चा आहे.जिल्ह्णात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ११ हजार ७५१ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात देण्यात आलेले आहे. या योजनेत पात्र लाभार्थींची निवड ही सामाजिक, आर्थिक आरक्षणाच्या यादीतून करण्यात येणार आहे. या ११ हजार ७५१ लाभार्थींपैकी सर्वाधिक लाभार्थी दिंडोरी तालुक्यात १२६७ तर सर्वात कमी लाभार्थी देवळा तालुक्यात ३७६ असल्याचे समजते. त्याखालोखाल कळवण ११४२, सुरगाणा १०७६ तसेच निफाड ४६७ व येवला ५०२ असल्याचे कळते. त्यातही अनूसूचित जमाती संवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी मिळत नसल्यानेच उद्दिष्टपूर्ती होत नसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. मार्च २०१७ अखेर म्हणजेच चार महिन्यांत ही घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात असले तरी घरकुले बांधण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)