शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक दुर्बलांना मिळणार हक्काचे घर

By admin | Updated: April 15, 2017 01:41 IST

आर्थिक दुर्बलांना मिळणार हक्काचे घरसुभाष भामरे : आडगाव येथे घरकुल योजनेचे भूमिपूजन; ग्रामस्थांनी फिरविली पाठ

नाशिक : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ७० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरांची निर्मिती होत आहे. या माध्यमातून देशातील गरिबांना हक्काची घरे मिळणार असल्याने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा हेतू साध्य होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी केले. आडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूललगतच्या मोकळ्या भूखंडावर म्हाडातर्फे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी बांधण्यात येणाऱ्या ४४८ सदनिकांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, महापौर रंजना भानसी, आमदार बाळासाहेब सानप, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायीसमिती सभापती शिवाजी गांगुर्डे, नगरसेवक उद्धव निमसे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर आदि उपस्थित होते. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने प्रशासनाने कडेकोट पोलीस बंदोबस्तात म्हाडाचे भूमिपूजनाचा घाट घातल्यामुळे प्रकल्पस्थळाला छावणीचे रूप प्राप्त झाले होते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तासह दंगा नियंत्रण पथक व शिघ्रकृती दलाचे पथकही कार्यक्रमस्थळी तैनात करण्यात आल्याने गावकऱ्यांनी निदर्शने न करता शांततेच्या मार्गाने भामरे यांना निवेदन देत प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. प्रकल्पाला गावकऱ्यांचा विरोध असल्याने प्रशासकीय अधिकारी व सत्ताधारी पक्षाचे नेते वगळता सर्वसामान्य नागरिकांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. म्हाडाचे नाशिक मंडळ मुख्य अधिकारी रमेश मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. व्ही. टी. पोद्दार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)