मालेगाव : येथील उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजाररोड येथे छापा टाकून सुमारे ४७ हजार ९५० रुपयांचा गुटका व पानमसाला जप्त केला. जप्त केलेल्या गुटक्याची होळी करण्यात आली. गेल्या बुधवारी पोलीस उपअधीक्षक राजमाने यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक नितीन खैरनार, पोलीस कर्मचारी इम्रान सय्यद, गिरीश बागुल, गणेश न्हावकर आणि मनपाचे अन्नसुरक्षा अधिकारी एस. जे. मंडलिक, जी.एम. गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली. बाजाररोड येथे खालीद हुसेन शाहीद हुसेन ऊर्फ खालीद मोट्या यांचे अफसरा जनरल स्टोअर्स येथे छापा टाकला. त्यात राज्य शासनाने प्रतिबंध केलेल्या गुटका, पानमसाल्याची ५३५ पॅकेट मिळून आले. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या उपस्थितीत गुटक्याची होळी करण्यात आली. (प्रतिनिधी)
मालेगावी ५० हजारांच्या गुटख्याची होळी
By admin | Updated: April 8, 2017 23:25 IST
मालेगाव : येथील शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजाररोड येथे छापा टाकून सुमारे ४७ हजार ९५० रुपयांचा गुटका व पानमसाला जप्त केला.
मालेगावी ५० हजारांच्या गुटख्याची होळी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}