ट्रेलरची उभ्या ट्रकला धडक; एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 01:21 AM2021-04-19T01:21:26+5:302021-04-19T01:22:21+5:30

मनमाड-मालेगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ट्रेलरने धडक दिल्याने ट्रकमागे उभा असलेला क्लीनर दोन वाहनांत दबून ठार झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Hitting the trailer's vertical truck; One killed | ट्रेलरची उभ्या ट्रकला धडक; एक जण ठार

ट्रेलरची उभ्या ट्रकला धडक; एक जण ठार

Next

मालेगाव : मनमाड-मालेगाव रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला ट्रेलरने धडक दिल्याने ट्रकमागे उभा असलेला क्लीनर दोन वाहनांत दबून ठार झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
 ट्रकचालक राजू जबारलाल आहिरवार (३७, रा. रेल्वे क्रॉसिंगजवळ, तहसील जि. गुणा) यांनी फिर्याद दिली. आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रेलर (क्र. एमएच २१ बीएच १७१९) मनमाड मालेगाव रस्त्यावरील हॉटेल राधिकासमोर पटांगणात मागे येत असताना पाठीमागे उभ्या असलेल्या ट्रकला  (क्र. एमपी ०९ एचएच ५५७३) मागील बाजूने धडक दिली. त्या वेळी ट्रकच्या पाठीमागे उभा असलेला क्लीनर महाराजसिंग प्रेमनरण कलावत हा दोन वाहनांमध्ये दबून ठार झाला. 

Web Title: Hitting the trailer's vertical truck; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.