शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

हायटेक कुरापत बनली फसवेगिरी

By admin | Updated: October 16, 2014 01:23 IST

हायटेक कुरापत बनली फसवेगिरी

 

नाशिक, दि. १५ - इंटरनेटमध्ये उपलब्ध वेबसाईट व अ‍ॅप्सद्वारे आज कोणीही दुसऱ्यांचे प्रोफाईल व वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करून संकट ओढवून घेत आहे. याचे एक माध्यम इंटरनेट बनले आहे. याद्वारे स्पूफिंग कॉल आणि फेक एसएमएस सर्व्हिस एक अशी सुविधा आहे, की ज्यात कुठलाही क्रमांक फिड करून त्याला कॉल व मेसेज करता येतो. इतरांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर फेक कॉल करण्यासाठी केला जात आहे. ठगण्यासाठी केला जातो वापरशहरातील काही नागरिकांना त्यांच्याच मोबाईल क्रमांकावरून कॉल येत आहेत व सांगण्यात येते की, तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली आहे. काही भामटे आता इंटरनेटद्वारे मोबाईल क्रमांकाचा डेटा मिळवून स्पूफिंग कॉल करीत आहेत. कुरापत येईल अंगलटशहरातील अनेक नागरिकांनी आम्हाला कोटींचे बक्षीस मिळाल्याचा मेसेज मोबाईलवर आला आहे. अनेकांनी तर कॉल आल्याचेदेखील सांगितले. दिवाळीचे बक्षीस तुम्हाला मिळणार, असेही फेक कॉल नागरिकांना येत आहेत. काही हायटेक कुरापतखोर इतरांच्या मोबाईल क्रमांकाचा दुरुपयोग करीत आहेत. अ‍ॅप्सपण कारणीभूत...आपला मोबाईल नंबर शेअरिंगसाठी मोबाईल अ‍ॅप्सदेखील कारणीभूत ठरत आहेत. कुठल्याही अ‍ॅप्सला इन्स्टॉल करण्याअगोदर त्या अ‍ॅप्सची पूर्ण माहिती मिळवायला हवी. काही अ‍ॅप्स डाऊनलोड केल्यामुळे आपली वैयक्तिक माहिती इंटरनेटवर सेव्ह होते, त्यामुळे अ‍ॅप्स डाऊनलोड करणे धोकादायक ठरले आहे.