शहरं
Join us  
Trending Stories
1
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा उमेदवाराच्या कारवर हल्ला
3
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
4
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, फोडल्या काचा
5
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
6
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
7
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
8
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
9
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
10
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
11
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
12
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
13
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
14
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
15
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
17
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
18
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
19
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
20
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
Daily Top 2Weekly Top 5

लोणजाई डोंगरावर औषधी वनस्पती

By admin | Updated: November 15, 2016 00:35 IST

निफाड : सोनेवाडीजवळील भाविकांच्या श्रद्धास्थानाचे वाढले महत्त्व

निफाड : तालुक्यातील सोनेवाडीजवळील लोणजाई डोंगरावर असलेले लोणजाई देवी मंदिर जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. सध्या औषधी वनस्पतींच्या दृष्टीनेही हा डोंगर चर्चेत आला आहे. या डोंगरावर जास्तीत जास्त औषधी वनस्पती असल्याचा निष्कर्ष नाशिक येथील वनस्पती संशोधक आणि पर्यावरणतज्ज्ञ जुई पेठे यांनी काढला आहे. निफाड तालुक्यातील लोणजाई डोंगर हा नाशिक-औरंगाबाद रस्त्यापासून ५ ते ६ किमी अंतरावर सोनेवाडी गावाजवळ आहे. या डोंगराचे क्षेत्र ६० ते ६५ एकर आहे. या डोंगरावरील वनसंपत्ती कमी होत चालल्याने हा पुरातन डोंगर पुन्हा हिरवागार करावा या उद्देशाने निफाड येथील स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक केंद्राचे प्रमुख वि. दा. व्यवहारे यांच्या पुढाकाराने व येथील स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने वर्षभरापासून वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे. विविध संस्था शाळा, गावे यांच्या मदतीने या डोंगरावर वृक्षारोपण सुरु असून लोणजाई डोंगर पुन्हा हिरवाईने नटायला लागला आहे. नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगगड आणि अंजनेरी पर्वत या परिसराप्रमाणेच लोणजाई डोंगरही जैवविविधतेने नटलेला आहे. दुर्मीळ औषधी वनस्पती या डोंगरावर मोठ्या प्रमाणात आहे, त्याचा अभ्यास करावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे यांनी निफाड येथील समर्थ सेवेकरी वि. दा. व्यवहारे व त्यांच्या सहकार्यांना केले आहे. यातील बऱ्याचशा वनस्पती किडनी स्टोन कावीळ, कॅन्सर अशा असाध्य आजारांवर उपचार करण्यासाठी उपयोगात येणाऱ्या आहेत, अशी माहिती जुई पेठे यांनी दिली.(वार्ताहर)