शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी कुटुंबांना मदत

By admin | Updated: April 30, 2017 23:02 IST

येवला : शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी येथील युवकांनी क्रि केट चषक या क्रिकेट सामन्याचे आयोजन करून जमा झालेल्या निधीतून आदिवासींना मदत करण्यात आली.

 येवला : तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गरीब शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी व दुष्काळाचा दाह कमी करण्याच्या हेतूने येथील युवकांनी शिंदेपाटील क्रि केट चषक या राज्यस्तरीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करून यानिमित्त जमा झालेल्या निधीतून आदिवासींना मदत करण्यात आली. प्रारंभी येवला शहर तालुक्यातील गरजू १०१ ग्रामस्थांना गहू, तांदूळ, तेल, साखरेसह संपूर्ण ५५ किलो वजनाच्या ५ हजार रुपये किमतीच्या किराणा मालाचे वाटप करण्यात आले. शहर व तालुक्यातीलगरीब नागरिक व शेतकऱ्यांना ही मदत शुक्र वारी देऊन क्रि केट स्पर्धेचे उद्घाटन केले.येवला तालुक्यातील आदिवासी कुटुंबांना दोन महिने पुरेल एवढा किराणा सामान देऊन शिंदे पाटील क्रिकेट चषकाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे, मनमाड पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी (दि. २८) संध्याकाळी ७ वाजता स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे, राजेंद्र लोणारी, सामाजिक कार्यकर्ते निंबा वाणी, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार कल्याणराव पाटील, जगदंबा एज्युकेशन सोसायटीचे कुणाल दराडे यांनी शिंदेपाटील क्रिकेट चषक समितीच्या उपक्रमाची स्तुती केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक किशोर दराडे, संजय सोमासे, रामेश्वर हाबडे, बाळू परदेशी, शैलेश देसाई, प्रशांत शिंदे, अल्केश कासलीवाल आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी, प्रस्तावना राजेंद्र बाकळे यांनी केली. यावेळी शहरातील क्रिकेटप्रेमींसह, आदिवासी महिला व कुटुंबप्रमुख आपल्या परिवारासह उपस्थित होते. या मदत मिळालेल्या कुटुंबांना संकटाच्यावेळी हातभार लागल्याने त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. (वार्ताहर)