घोटीत दहीहंडी उत्साहात

By Admin | Updated: August 21, 2014 00:15 IST2014-08-20T22:51:36+5:302014-08-21T00:15:52+5:30

घोटीत दहीहंडी उत्साहात

With the help of Ghoti Dahehandi | घोटीत दहीहंडी उत्साहात

घोटीत दहीहंडी उत्साहात

घोटी : येथे दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दहीहंडी उत्सवासाठी तालुक्यातून तरुणांची मोठी गर्दी झाली होती.
मोरया सोशल ग्रुपच्या वतीने ५१ हजार, तर नटखट मित्रमंडळाच्या वतीने २१ हजार रुपयांच्या बक्षिसांच्या दहीहंडीचे जैन मंदिर परिसरात आयोजन केले होते.
घोटी येथील गजानन मित्रमंडळ, संतोष मित्रमंडळ व टिटोली येथील संग्राम गोविंदा पथकाने या उत्सवात सहभाग घेतला. अखेर सात थर लावून संग्राम गोविंंदा पथकांनी मोरया सोशल ग्रुप आयोजित ५१ हजार रुपयांची तसेच नटखट मित्रमंडळाची २१ हजाराची दहीहंडी फोडून बक्षीस मिळविले. मोरया ग्रुप दहीहंडीत माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी ५१ हजार रुपयांचे बक्षीस वितरण
केले.
याप्रसंगी मोरया सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीकांत काळे, अमोल मांडे, दीपक भोसले, कल्पेश हांडे, गुरूनाथ साळुंके, रमेश भगत, जयेश राखेचा, नीलेश राठोड, संदीप शिंदे, संतोष पांडे, विठ्ठल पांडे, महेंद्र वालझाडे, तर नटखट मित्रमंडळाच्या वतीने
मिलिंद वालतुले, विठ्ठल काळे, मंगेश काळे, पारस राखेचा, शरद हांडे, रवि मांदळे, सूरज शहा, तुषार बोथरा, ललित पिचा, पिंटू बेदमुथा, संतोष सोनार, अशोक काळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: With the help of Ghoti Dahehandi