शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

इगतपुरी तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 12:46 AM

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात जवळपास महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर रविवारपासून पहिल्यांदाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत शनिवारी (दि.२४) झालेला पाऊसही कमी आहे.

ठळक मुद्देखोळंबलेल्या शेतीकामांना वेग : चोवीस तासात २२२ मिमी पाऊस

सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यात जवळपास महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर रविवारपासून पहिल्यांदाच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत शनिवारी (दि.२४) झालेला पाऊसही कमी आहे. गतवर्षीच्या पावसात तालुक्यातील धरणामध्ये अर्ध्याहून अधिक साठा होता. यावर्षी अजून अर्ध्याहून खालीच साठा आहे. गतवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात १३०७ मिमी पाऊस झाला होता, तर यावर्षी सरासरी १११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.गेल्या महिनाभरापासून गायब असलेल्या वरुणराजाने गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात सर्वत्र दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने संततधार पावसामुळे ग्रामीण भागात काहीसे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चोवीस तासात २२२ मिमी पावसाची विक्रमी नोंद झाली आहे, तर दिलासादायक बाब म्हणजे पावसाने इगतपुरी तालुक्यात हजारी गाठली असून, आतापर्यंत १११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या दमदार पावसाने धरणसाठ्यांमध्येही थोडक्यात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे इगतपुरीच्या पूर्व भागातील दुबार पेरणीला आलेल्या भात रोपांना नवसंजीवनी मिळाली ाआहे. शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. दरम्यान, बळीराजा शेतातील भात रोपांना खते, शेत मशागत करण्यात व्यस्त आहे.पूर्व भागातून मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग भात लागवडीसाठी इगतपुरी, आडवन, दौंडत, घोटी, वैतरणा भागात जाताना दिसत आहे. तर यंदा पूर्व भागातील नदी, नाले जुलैच्या शेवटाला वाहताना दिसत आहे. जून-जुलै हे दोन महिने उलटूनही टाकेद येथील कडवा नदीपात्र कोरडेठाक होते. मात्र तीन -चार दिवसांपासून पावसाने परिसरात जोर धरल्याने कडवा नदी वाहू लागली आहे.यंदा इंधनाचे (डिझेलचे) दर वाढल्याने भातशेती मशागतीसाठी, शेतातील भात लागवडीसाठी, शेतकऱ्यांना गाळ तयार करण्यासाठी ट्रॅक्टरला ९०० रुपये प्रतितासाप्रमाणे तर बैलजोडी औतासाठी १५०० रुपये पूर्ण दिवसाला शेती वाहणीसाठी द्यावे लागत आहे. तर दोन-तीन दिवसांपासून पूर्व भागात सर्रासपणे विजेचा लपंडाव सुरू असल्याने डिझेल इंजिनच्या साह्याने शेतकऱ्यांना शेतात पाणी भरावे लागत आहे.

धरणातील गतवर्षी आणि यंदाचा पाणीसाठा टक्केवारीच्या तुलनेत :दारणा ४८.६६ टक्केभावली ६६.६३ टक्केभाम १५.१७ टक्केवाकी १.६९ टक्केवालदेवी ६६.५८ टक्केमुकणे २४.३ टक्केगतवर्षी - यावर्षी१३०७ मिमी - १११३ मिमीदारणा ४०९१ दलघफू - ३४७६भावली १०५१ - दलघफू ८९८वाकी २३ - दलघफू ४२मुकणे १९३९ - दलघफू १७२५कडवा ३११ दलघफू - २२८भाम ६५४ - दलघफू ३७४.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी