शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड येथे जोरदार पाऊस

By admin | Updated: June 28, 2016 23:58 IST

चांदवड येथे जोरदार पाऊस

चांदवड : शहरात आज, मंगळवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बळीराजासह सर्वच चिंतातुर होते. मात्र आजच्या पावसाने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.आज दिवसभर प्रचंड उकाडा होत होता. सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी जोरदार पाऊस पडेल असे वाटत असताना मात्र अल्पशी हजेरी लावली; मात्र मंगळवारी अर्धा तासात संपूर्ण शहर जलमय झाले. त्यामुळे शहरातील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता.जून महिना पूर्णपणे कोरडा जातो की काय? या भीतीने नागरिक होते तर पाऊस पडला नसता तर तीव्र स्वरूपाच्या पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले असते, अशी परिस्थिती असताना पावसाचे दुसऱ्यांदा आगमनाने काहीसे समाधान झाले आहे. मात्र या पावसाने दडी मारू नये, अशी अपेक्षा बळीराजा करीत आहे. मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा चिंताक्रांत झाला होता. परिणामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे खोळबंली होती. मात्र पूर्णपणे जून महिना कोरडा गेला आता शेवटी तरी या पावसाने दमदार हजेरी द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.वणी : वणी व परिसरात पावसाने हजेरी लावली, हा पाऊस पेरणीयोग्य नसल्याचे शेतीतज्ज्ञांचे मत आहे मात्र पावसामुळे आठवडेबाजारात तारांबळ उडाली.दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास पावसास प्रारंभ झाला. सुरुवातीला हलकासा पाऊस झाला तद्नंतर पावसाचा जोर काहीसा वाढला. दहा ते पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला. काहीशी विश्रांती घेतल्यानंतर काही वेळेनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, आज मंगळवारी आठवडेबाजार असल्याने खरेदी व विक्री करणाऱ्या दोन्ही घटकाची बाजारतळ परिसरात गर्दी होती. व्यवसायाची वेळ असताना पावसाने हजेरी लावल्याने दोन्ही घटकांची तारांबळ उडाली तर वणी - दिंडोरी रस्त्यावर विद्युतवाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्याने काही वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पावसाळ्यापूर्वीची तांत्रिक दुरुस्ती केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. (वार्ताहर)