शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

पालकांच्या छळाला कंटाळून ‘त्यांनी’ सोडले घर...

By admin | Updated: August 26, 2016 22:16 IST

मनमाड : चार बालकांची निरीक्षणगृहात रवानगी

मनमाड : पालकांकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने रागाच्या भरात घर सोडलेल्या नाशिक येथील चार अल्पवयीन मुलांना मनमाड रेल्वे सुरक्षा बल कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे निरीक्षणगृहात रवाना करण्यात आले आहे.गाडी क्रमांक १२३३६ लोकमान्य टिळक टर्मिनस-भागलपूर एक्स्प्रेस मनमाडच्या फलाट क्रमांक २ वर उभी असताना रेसुब कर्मचारी राकेश पहेल, ए. एन. देवरे, तिकीट तपासणीस समीर समधरकर यांना अल्पवयीन मुलगा व तीन मुली संशयास्पद निदर्शनास आल्या. त्यांना रेसुब कार्यालयात चौकशीसाठी आणले. रेसुब निरीक्षक के.डी. मोरे यांनी या बालकांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता प्रवीण जयसिंग राठोड (१२), काजल जयसिंग राठोड (१३), उज्ज्वल महेश सोनवणे (११), स्रेहा संजय भालेराव (१०) (सर्व, रा. गुलाबवाडी, नाशिकरोड) अशी नावे त्यांनी सांगितली. यामधे दोघे बहीण भाऊ असून, सर्वजण एकमेकांचे नातेवाइक आहेत. ही बालके नाशिकच्या तक्षशीला विद्यालयात शिक्षण घेत आहेत. अधिक चौकशी केली असता या पालकांकडून मानसिक व शारीरिक छळ होत असल्याने घर सोडल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधिकारी राकेश पहेल व शिल्पा शिंदे यांनी या बालकांची अन्य चौकशी व वैद्यकीय तपासणी करून बालनिरीक्षण गृहात रवाना केले.मनमाड रेल्वेस्थानकावर फलाट क्रमांक ३ वर रेसुब कर्मचारी सुनील कुमावत, रामदयाल हे गस्त घालत असताना एक अल्पवयीन मुलगा विनातिकीट फिरताना आढळून आला. त्याची अधीक चौकशी केली असता त्याचे नाव रोहित राजेश सोळंकी (१०), रा. हरसूल, जि. औरंगाबाद असे असल्याचे समजले. घरच्यांना न सांगता घरातून पळून आलेल्या या अल्पवयीन मुलाला बालनिरीक्षणगृहात रवाना करण्यात आले. रेसुब कर्मचारी आर.के. मिना, त्रिपाठी, सुरेश पाटील यांनी ही कार्यवाही केली. (वार्ताहर)