शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महापालिकेच्या जागेवर झोपड्यांचे अतिक्र मण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:21 IST

भारतनगरमधील सुमारे दहा एकर महापालिकेची मालिकेची जागेवरील अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण महापालिकेचे अतिक्र मण निर्मूलन विभाग केव्हा काढणार आहे. तसेच मनपाची मालकीची जागा मोकळा श्वास केव्हा घेणार? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.

इंदिरानगर : भारतनगरमधील सुमारे दहा एकर महापालिकेची मालिकेची जागेवरील अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण महापालिकेचे अतिक्र मण निर्मूलन विभाग केव्हा काढणार आहे. तसेच मनपाची मालकीची जागा मोकळा श्वास केव्हा घेणार? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरात विविध ठिकाणी धार्मिक स्थळे हटवण्यात आली, त्यानंतर वडाळागावातील गावातील सावित्रीबाई झोपट्टीतील सुमारे चारशे अनधिकृत झोपड्या हटवण्याची कारवाई करण्यात आली. आता भारतनगरमधील महापालिकेच्या भूखंडावर असलेले अनधिकृत झोपड्यांचे अतिक्र मण केव्हा काढणार? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. महापालिकेने आरक्षित करून खरेदी केलेल्या भूखंडाचे जुने जमीनमालक आणि दलालांनी मनपाचे भूखंड गुंठे वार पद्धतीने विक्र ी केल्याचे उघडीस येऊ अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने उलट सुलट चर्चा होत आहे. भारत नगरच्या या भूखंडावर इ.स. १९६९ साला पूर्वीपासून दोन कुटुंबाची सुमारे शंभर जणांची सातबारा उतारावर नावे होती. यामुळे विक्र ी करण्यास अडचण निर्माण होत असे इ.स.१९७० महापालिकेने सदर जागेवर गुरांचा गोठा शंभर फुटी डीपी रस्ता व बेघरांसाठी घरी अशा तीन योजनांसाठी आरक्षण टाकली होते. सुमारे वीस वर्षांपासून संबंधित मालक व काही दलांनी संगमत करून एक एक करून सुमारे दोन लाख ते तीन लाख रु पये गुंठ्याने फक्त नोटरी करून जागा विकण्याचा धडका सुरू केला होता. आरक्षणासाठी जमीनमालकांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर मनपा इ.स.१९८९ पासून थोडे थोडे करून इ.स. २०१० मध्ये सुमारे सहा कोटी पन्नास लाख रु पये दिले. सुमारे दहा एकर जमीन मनपाच्या नावावर झाली आहे. सातबारा उतारावरही मनपाचे नाव लागले गेले.सुमारे वीस वर्षांत काही दलालांनी एकेक करून संपूर्ण जमिनीवर सुमारे ७०० झोपड्या बसविल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी रु पयांची नागरिकांची फसवणूक झाल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे महापालिकेचे वतीने न्यायालयाच्या निदर्शनानुसार विविध धार्मिक स्थळे हटविण्यात आली तसेच वडाळागावातील सुमारे चारशे अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या, परंतु भारतनगरमधील महापालिकेची सुमारे दहा एकर जमीन वर ६०० अधिक अनेक अनधिकृत झोपड्या अद्यापही अतिक्र मण निर्मूलन मोहिमेने आठविल्या नाहीत त्यामुळे मनपाच्या सदर आरक्षित जागेवर योजना राबविण्यात अडथळा निर्माण होत आहे.सर्रासपणे मनपाच्या जागेची खरेदी-विक्र ी सुरूचमहापालिकेचे वतीने सदर जागा मनपाची असून, कोणी खरेदी-विक्र ी केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यातील, असा इशाराचा फलकही लावला आहे. अद्यापही दलालांचा सुळसुळाट असून, सर्रासपणे मनपाच्या जागेची खरेदी-विक्र ी सुरूच आहे काही राजकारण्यांचा या दलालांना वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. महापालिकेचे जागेवरच जर अतिक्र मण काढू शकत नाही तर दुसऱ्याचे अतिक्र मण काढण्याचा काय अधिकार, असा उपरोधिक प्रश्नही नागरिकांनी केला आहे. पुन्हा महापालिकेच्या वतीने अनेक धार्मिक स्थळे अनधिकृत असल्याचे यादी घोषित करण्यात आली आहे, परंतु महापालिकेच्या जागेवरील अतिक्र मण केव्हा काढणार? असा प्रश्न नागरिक यांनी केला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण