शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीसह गुरुजींनी बॅँकेत स्वत:ला घेतले कोंडून

By admin | Updated: April 27, 2017 01:54 IST

नाशिक : चलन तुटवडा निर्माण झाल्यामुळे मागील महिनाभरापासून शिक्षकांना वेतनाची रक्कमदेखील मिळणे जिल्हा बॅँकेतून दुरापास्त झाले आहे.

नाशिक : चलन तुटवडा निर्माण झाल्यामुळे मागील महिनाभरापासून शिक्षकांना वेतनाची रक्कमदेखील मिळणे जिल्हा बॅँकेतून दुरापास्त झाले आहे. त्यामुळे कंटाळून बागलाण तालुक्यातील एका अपंग शिक्षकाने पत्नीसह स्वत:ला जिल्हा बॅँकेच्या शाखेत अधिकाऱ्यांसह कोंडून घेतले.जिल्हा बॅँकेकडून शेतकऱ्यांना नवे कर्ज वाटप होत नाही तसेच शेतकऱ्यांना वेतनाची रक्कमही मिळत नसल्याने खातेदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षकांच्या हातात पैसे प्राप्त होत नसल्याने त्यांचे दैनंदिन व्यवहार कोलमडले आहे. बागलाण तालुक्यातील मुंजवाड येथील रहिवासी शिक्षक प्रमोद धर्मा लोखंडे हे महिनाभरापासून पंचवटी कारंजा येथील जिल्हा बॅँकेच्या शाखेत भविष्य निर्वाह निधीची जमा केलेल्या रकमेतून मुलीच्या शिक्षणासाठी रकमेची मागणी करत आहे; मात्र आश्वासनांखेरीज त्यांना बॅँकेकडून कुठलीही रक्कम अद्याप दिली गेली नाही. ‘मोठी रक्कम असल्याने ती लवकर देता येणार नाही, बॅँकेकडे पैसे नाही’ हेच उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळत असल्याने त्यांच्या संतापाचा बुधवारी (दि. २६) संध्याकाळी उद्रेक झाला. त्यांनी पत्नीसमवेत शाखेत येऊन बॅँकेचे शटर खाली खेचले आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांसह स्वत:ला कोंडून घेतले. जोपर्यंत रक्कम हातात मिळणार नाही, तोपर्यंत बॅँकेतून बाहेर पडणार नाही, आणि कोणालाही बाहेर पडू देणार नाही, असा पवित्रा लोखंडे व त्यांच्या पत्नीने घेतला. तब्बल दीड ते पावणेदोन तास त्यांनी बॅँकेचा मुख्य दरवाजा बंद ठेवला. सात वाजेच्या सुमारास बॅँकेचे व्यवस्थापक धनंजय धनवटे यांनी लोखंडे दाम्पत्यांना कक्षामध्ये बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र यावेळी त्यांचा संयम सुटला व त्यांनी आरटीजीएससह लेखी आश्वासनांची कागदपत्रे यावेळी टेबलावर फेकली. पैसे न दिल्यास पत्नीसह शाखेत आत्महत्या करू, असा इशारा दिला. वाद वाढल्याने त्यांनी मुख्य प्रशासकीय व्यवस्थापकांशी संतप्त लोखंडे यांचे भ्रमणध्वनीवरून बोलणे करून दिल्यानंतर लोखंडे यांनी काही तासांची मुदत देत असल्याचे सांगून बॅँकेचे शटर उघडले.