शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँक वाचविण्यासाठी पालकमंत्र्यांचा पुढाकार

By admin | Updated: April 30, 2017 01:35 IST

नोटाबंदीनंतर सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे

 गणेश धुरी  नाशिकनोटाबंदीनंतर सातत्याने या ना त्या कारणाने चर्चेत असलेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँक मोठ्या आर्थिक संकटात सापडली आहे. जिल्हा बॅँकेची ही आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हा बॅँकेला आर्थिक कोंडीतून बाहेर काढण्यासाठी राज्य शिखर बॅँकेसह नाबार्डकडून अतिरिक्त निधी मिळवून देणार असून, जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येत्या मंगळवारी किंवा बुधवारी (दि. ३) बैठक आयोजित करण्याबाबत गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतल्याचे कळते.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची जवळपास अडीच हजार कोटींची कर्ज वसुली थकल्याने जिल्हा बॅँकेची आर्थिक कोंडी झालेली असतानाच नोटाबंदीच्या काळात जमा झालेली ३४१ कोटींची रक्कमही स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दिल्याने तोही मोठा आर्थिक बोजा जिल्हा बॅँकेवर पडला आहे. इतकेच नव्हे तर जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी ८३ कोटींची रक्कम भरली़ त्या रकमेपैकी जिल्हा बॅँकेने स्टेट बॅँक आॅफ इंडियाकडे वर्ग केलेली ४३ कोटींची रक्कमही स्टेट बॅँकेने चलन तुटवड्यामुळे देण्यास असमर्थता दर्शविल्याने जिल्हा बॅँकेला दररोज शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील कोणत्या ना कोणत्या शाखेला रोजच कुलूप लागण्याचे प्रकार घडत आहे. या सर्व प्रकरणांमुळे जेरीस आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाने पालकमंत्री गिरीश महाजन यांची मुंबईला तसेच शनिवारी (दि.२९) नंदुरबारला भेट घेऊन मदतीसाठी साकडे घातल्याचे समजते.इतकेच नव्हे तर नरेंद्र दराडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामाही यापूर्वीच दिला असून, भाजपाच्या सहा संचालकांपैकी कोणालाही अध्यक्ष करा, मात्र जिल्हा बॅँकेला सरकारची मदत मिळवून द्या, अशी विनंती पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. त्यानुसार गिरीश महाजन यांनी येत्या मंगळवारी किंवा बुधवारी जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक करून देऊन सरकारकडून निधीची मदत करून देण्याचे आश्वासन संचालक मंडळाच्या शिष्टमंडळाला दिल्याचे समजते.