शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गट-गणांची ५ आॅक्टोबरला सोडत

By admin | Updated: September 27, 2016 01:53 IST

गटांची जिल्हाधिकारी कार्यालय, तर गणांची तहसील कार्यालयात

नाशिक : बहुप्रतीक्षित जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या जागांची आरक्षणाची सोडत पद्धत व चक्रानुक्रम येत्या ५ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता प्रत्येक तहसील व प्रांत कार्यालयात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या गटांचे आरक्षण हे दि. ५ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात सोडत काढण्यात येईल. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम १९६१ मधील कलम १२ उपकलम (१), कलम ५८ (१) (अ) प्रमाणे व जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम निवडणूक विभाग व निर्वाचन गण प्रसिद्ध करण्यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन  अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या आहेत. त्याकरिता सोडत (लॉटरी) पद्धतीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषद गटांचे आरक्षण सोडत दि. ५ आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता नियोजन भवनात होईल. नियोजन भवनातच दुपारी १२ वाजता गणांची सोडत काढण्यात येईल. प्रत्येक तालुकानिहाय पंचायत समिती गणांची सोडत पुढील ठिकाणी होईल. सर्व गणांची सोडत सकाळी ११ वाजता काढण्यात येईल. पंचायत समिती, बागलाण - पंचायत समिती बागलाण सभागृह, पंचायत समिती, मालेगाव - प्रांत कार्यालय मालेगाव, पंचायत समिती, नांदगाव - तहसील कार्यालय सभागृह, नांदगाव, पंचायत समिती येवला - तहसील कार्यालय सभागृह, येवला, पंचायत समिती चांदवड - मध्यवर्ती प्रशासकीय इमारत सभागृह, चांदवड, पंचायत समिती देवळा - पंचायत समिती सभागृह, देवळा, पंचायत समिती, कळवण - पंचायत समिती सभागृह, कळवण, पंचायत समिती, सुरगाणा - तहसील कार्यालय सभागृह, सुरगाणा, पंचायत समिती, दिंडोरी - तहसील कार्यालय सभागृह, दिंडोरी, पंचायत समिती, निफाड - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन सभागृह, निफाड, पंचायत समिती, इगतपुरी - पंचायत समिती सभागृह, इगतपुरी, पंचायत समिती, त्र्यंबकेश्वर - तहसील सभागृह, त्र्यंबकेश्वर, पंचायत समिती, सिन्नर - तहसील कार्यालय सभागृह, सिन्नर, पंचायत समिती पेठ - पंचायत समिती सभागृह, पेठ यानुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)उत्सुकता शिगेलाजिल्हा परिषद गट व गणांची प्रचंड उत्सुकता इच्छुकांना लागली आहे. इच्छुकांनी तर आतापासूनच अमुक तालुक्यातील अमुक गट आरक्षित झाले. अमुक तालुका संपूर्ण आरक्षित राहील. तमुक तालुक्यातील सर्व गट खुले राहतील, अशा अटकळी बांधल्या आहेत. तालुकास्तरावरून व जिल्हास्तरावरून आरक्षणाबाबतचे प्रस्ताव यापूर्वीच विभागीय आयुक्त कार्यालयाकडे गेले आहेत.