शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव बसवंत शहरातील किराणा दुकान १२ दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 18:54 IST

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात झपाट्याने रुग्ण संख्या वाढत असतांना बेड ऑक्सिजन, रेमडीसिविर आदीच्या तुडवडीने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गाव बंद ठेवावे लागेल यासाठी पिंपळगाव ग्रामस्थ, व्यापारी नागरिक व सर्वपक्षीय बैठक प्रशासनाच्या उपस्थित संपन्न झाली, त्यात २१ ते ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अत्यावश्यक असणारे किराणा दुकाने देखील बंद असतील असा निर्णय किराणा असोशियनने स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.

ठळक मुद्देकोरोना साखळी तोडण्यासाठी किराणा असोशियनचा निर्णय

पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरात झपाट्याने रुग्ण संख्या वाढत असतांना बेड ऑक्सिजन, रेमडीसिविर आदीच्या तुडवडीने अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गाव बंद ठेवावे लागेल यासाठी पिंपळगाव ग्रामस्थ, व्यापारी नागरिक व सर्वपक्षीय बैठक प्रशासनाच्या उपस्थित संपन्न झाली, त्यात २१ ते ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र अत्यावश्यक असणारे किराणा दुकाने देखील बंद असतील असा निर्णय किराणा असोशियनने स्वयंस्फूर्तीने घेतला आहे.नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या पिंपळगाव बसवंत शहरात झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी प्रशासनाकडून कडक निर्बंध घालून देखील रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासन पूर्ण धास्तावले आहे. त्याअनुषंगाने काहीतरी योग्य निर्णय घेऊन या कोरोनाच्या महामारीला हद्दपार कसे करायचे यासाठी सर्व पिंपळगावकरांनी प्रशासनाच्या उपस्थित एकत्रित बैठक घेतली त्यात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्ताने बंद ठेवून १० दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला.मात्र रुग्ण संख्या आटोक्यात आणायची असेल तर आपणही पुढाकार घ्यावा या उद्देशाने किराणा असोशियन यांनी देखील स्वयंस्फूर्तीने बारा दिवस किराणा मालाचे दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पिंपळगाव बसवंत शहरातील बाजारपेठ निर्मनुष्य झाली आहे नेहमी गजबजलेला परिसर देखील सुन्न झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर पिंपळगावची कोरोना महामारीची साखळी तुटेल अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.आपण देखील आपल्या गावाचा परिवाराचा विचार करणे गरजेचे आहे. आपले पण काही गावासाठी देणे आहे त्यामुळे स्वयंस्फूर्तीने किराणा असोसिएशनच्या झालेल्या बैठकीत किराणा दुकाने देखील १२ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सर्व नागरिकांनी सहकार्य करावे.- संदीप कागदे, सेक्रेटरी,किराणा व्यापारी असोसिएशन. पिंपळगाव बसवंत.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत