शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे मूत्रपिंड नाशिकमध्ये दाखल

By admin | Updated: September 29, 2016 00:44 IST

शहर वाहतूक शाखा : सिन्नर-नाशिक ‘ग्रीन कॉरिडॉर’

नाशिक : पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयातून मूत्रपिंड घेऊन सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास नाशिककडे निघालेल्या रुग्णवाहिकेला (एमएच १५ ईएफ ००६४) सिन्नरपासून नाशिकपर्यंत पोलीस यंत्रणेने ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध करून दिला. पुणे येथील रुबी हॉल येथे एका मेंदू मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयव दान केल्याने देसले यांच्या रक्तगटाशी संबंधित व्यक्तीचा रक्तगट जुळला आणि त्याचे मूत्रपिंड तत्काळ रुग्णवाहिकेतून नाशिकला आणण्यात आले. अपोलो रुग्णालयाने रुबी रुग्णालयाशी संपर्क साधत रुग्णवाहिका रवाना केली. पुणे येथून सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास रुग्णवाहिके मध्ये तंत्रज्ञ अरुण भदाणे यांनी मूत्रपिंड सुरक्षितरीत्या ठेवले आणि चालक पाटील यांनी रुग्णवाहिका नाशिकच्या दिशेने चालविली. यावेळी कुठलाही ग्रीन कॉरिडॉर सिन्नरपर्यंत रुग्णवाहिकेला मिळाला नाही; मात्र शहर पोलिसांनी वाहतूक नियंत्रण शाखा व सिन्नर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. उपआयुक्त विजय पाटील यांनी बिनतारी संदेश यंत्रणेवरून ‘ग्रीन कॉरिडॉर’ आखण्याचा कॉल दिला. त्यानुसार सर्व वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज झाली. कारण पुण्यावरून निघालेल्या रुग्णवाहिकेला कॉरिडॉर नसल्यामुळे सिन्नरला येण्यासाठी तीन तास वीस मिनिटांचा कालावधी लागला. सिन्नर पोलिसांच्या पायलट जीपने रुग्णवाहिकेसाठी कॉरिडॉर आखला. पुणे महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने रुग्णवाहिकेला खोळंबा होऊ नये, याची पुरेपूर दक्षता सिन्नर पोलिसांनी घेतली होती. (प्रतिनिधी)१७ मिनिटांत रुग्णालयातबारा ते पंधरा मिनिटांमध्ये रुग्णवाहिका शिंदेपर्यंत आली आणि तेथून पुढे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आखलेल्या कॉरिडॉरने अपोलो रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिक ा अवघ्या १७ मिनिटांत पोहोचली. यावेळी शहर वाहतूक शाखा व नाशिकरोड, आडगाव पोलीस ठाण्याचे पॉइंट, नाकाबंदीवरील एकूण ११३ कर्मचारी व १८ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. सिन्नरफाटा, नाशिकरोड, बिटको, जेलरोड, नांदूरनाकामार्गे रुग्णवाहिका स्वामीनारायणनगरमध्ये आली. या मार्गावरील सर्व उपनगरीय रस्ते, चौफुलींवरील वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका मार्गस्थ होईपर्यंत थांबविली होती.