‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे मूत्रपिंड नाशिकमध्ये दाखल

By Admin | Updated: September 29, 2016 00:44 IST2016-09-29T00:44:07+5:302016-09-29T00:44:51+5:30

शहर वाहतूक शाखा : सिन्नर-नाशिक ‘ग्रीन कॉरिडॉर’

'Green Corridor' enters Kidney in Nashik | ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे मूत्रपिंड नाशिकमध्ये दाखल

‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे मूत्रपिंड नाशिकमध्ये दाखल

नाशिक : पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयातून मूत्रपिंड घेऊन सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास नाशिककडे निघालेल्या रुग्णवाहिकेला (एमएच १५ ईएफ ००६४) सिन्नरपासून नाशिकपर्यंत पोलीस यंत्रणेने ‘ग्रीन कॉरिडॉर’ उपलब्ध करून दिला.
पुणे येथील रुबी हॉल येथे एका मेंदू मृत रुग्णाच्या नातेवाइकांनी अवयव दान केल्याने देसले यांच्या रक्तगटाशी संबंधित व्यक्तीचा रक्तगट जुळला आणि त्याचे मूत्रपिंड तत्काळ रुग्णवाहिकेतून नाशिकला आणण्यात आले. अपोलो रुग्णालयाने रुबी रुग्णालयाशी संपर्क साधत रुग्णवाहिका रवाना केली.
पुणे येथून सकाळी पावणेनऊ वाजेच्या सुमारास रुग्णवाहिके मध्ये तंत्रज्ञ अरुण भदाणे यांनी मूत्रपिंड सुरक्षितरीत्या ठेवले आणि चालक पाटील यांनी रुग्णवाहिका नाशिकच्या दिशेने चालविली. यावेळी कुठलाही ग्रीन कॉरिडॉर सिन्नरपर्यंत रुग्णवाहिकेला मिळाला नाही; मात्र शहर पोलिसांनी वाहतूक नियंत्रण शाखा व सिन्नर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. उपआयुक्त विजय पाटील यांनी बिनतारी संदेश यंत्रणेवरून ‘ग्रीन कॉरिडॉर’ आखण्याचा कॉल दिला. त्यानुसार सर्व वाहतूक पोलीस यंत्रणा सज्ज झाली. कारण पुण्यावरून निघालेल्या रुग्णवाहिकेला कॉरिडॉर नसल्यामुळे सिन्नरला येण्यासाठी तीन तास वीस मिनिटांचा कालावधी लागला. सिन्नर पोलिसांच्या पायलट जीपने रुग्णवाहिकेसाठी कॉरिडॉर आखला. पुणे महामार्ग विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने रुग्णवाहिकेला खोळंबा होऊ नये, याची पुरेपूर दक्षता सिन्नर पोलिसांनी घेतली होती. (प्रतिनिधी)
१७ मिनिटांत रुग्णालयात
बारा ते पंधरा मिनिटांमध्ये रुग्णवाहिका शिंदेपर्यंत आली आणि तेथून पुढे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आखलेल्या कॉरिडॉरने अपोलो रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिक ा अवघ्या १७ मिनिटांत पोहोचली. यावेळी शहर वाहतूक शाखा व नाशिकरोड, आडगाव पोलीस ठाण्याचे पॉइंट, नाकाबंदीवरील एकूण ११३ कर्मचारी व १८ अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. सिन्नरफाटा, नाशिकरोड, बिटको, जेलरोड, नांदूरनाकामार्गे रुग्णवाहिका स्वामीनारायणनगरमध्ये आली. या मार्गावरील सर्व उपनगरीय रस्ते, चौफुलींवरील वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिका मार्गस्थ होईपर्यंत थांबविली होती.

Web Title: 'Green Corridor' enters Kidney in Nashik