शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

धान्य गुदामात कॅमेरे कार्यान्वित

By admin | Updated: March 29, 2015 00:30 IST

पहिला प्रयोग : काळाबाजार रोखण्यासाठी यंत्रणेचा उपक्रम

नाशिक : सार्वजनिक वितरण प्रणालीत अधिकाधिक पारदर्शकता आणण्याबरोबरच धान्याचा काळाबाजार व गैरव्यवहार रोखण्यासाठी धान्य गुदामांवरच सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून, नाशिक तहसीलदारांनी शहरातील धान्य गुदामावर तीन कॅमेरे बसवून त्याआधारे नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली आहे. सुरगाणा व सिन्नर येथे मोठ्या प्रमाणावर धान्याचा काळाबाजार झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंंह कुशवाह यांनी गेल्या आठवड्यातच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले होते. सुरगाणा व सिन्नर येथील धान्य घोटाळ्यात वाहतूकदार, रेशन दुकानदार व धान्य गुदामपालांचे संगनमत उघडकीस आले होते. शासकीय यंत्रणेच्या सहभागाशिवाय धान्याचा अपहार वा काळाबाजार होऊ शकत नसल्याचे या दोन्ही घटनांवरून स्पष्ट झाल्याने ते रोखण्यासाठी धान्य गुदामांवरच नियंत्रण आणण्याचा विचार पुढे आला व त्याआधारेच सर्व धान्य गुदामांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकरवी सर्व तहसीलदारांकडून माहिती मागविली जात असतानाच नाशिक तहसीलदार गणेश राठोड यांनी शासकीय विश्रामगृहाजवळील शासकीय धान्य गुदामात तीन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत. गुदामाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक कॅमेरा व आत दोन असे तीन कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले आहेत. प्रवेशद्वारावरील कॅमेऱ्यातून धान्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंद होईल, तर गुदामातील कॅमेरे आतील धान्यावर लक्ष ठेवण्यास उपयोगी पडणार आहेत. जिल्ह्यात नाशिकमध्येच पहिला प्रयोग करण्यात आल्याने त्याच्या आधारे गुदामांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)