शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
3
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
4
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
5
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
6
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
7
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
8
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
9
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
10
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
11
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
12
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
13
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
14
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
15
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
16
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
17
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
18
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
19
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
20
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांकडून सहा दुचाकी हस्तगत

By admin | Updated: August 23, 2016 00:46 IST

पाठलाग : इंदिरानगर पोलिसांनी आवळल्या तिघांच्या मुसक्या

इंदिरानगर : दुपारच्या सुमारास परिसरात गस्तीवर असलेल्या इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधपथकाला एका दुचाकीवरून तिघे संशयित फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या पाठलाग करत तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, रविवारी (दि.२१) गुन्हे शोध पथक दुपारी कलानगर परिसरातून गस्त घालत होते. यावेळी तिघे संशयित एका दुचाकीवरून परिसरात संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. पथकाने दुचाकीचा पाठलाग सुरू केला असता चोरट्यांनी गल्ली बोळातून दुचाकी हिरो होंडा सिडी डिलक्स (एमएच १९ डीएन ९९५६) दामटवित वडाळा पाथर्डी रस्त्याने सुसाट नेली. यावेळी पोलिसांनीही वाहनाचा वेग वाढवून तत्काळ साईनाथनगर नाकाबंदी पॉइंटला बिनतारी संदेश यंत्रणेवरुन ‘अलर्ट कॉल’ दिला. दरम्यान, पथकाने रथचक्र चौकात गतिरोधकाच्या प्रारंभी दुचाकी अडविली. तिघा संशयितांना ताब्यात घेत त्यांची मध्यरात्रीच्या सुमारास कसून चौकशी केली असता चोरीच्या सहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. संशयित दुर्गेश ऊर्फ सागर सुभाष दवंडे (२१, माउली बंगला, (वॉचमन खोली) पाथर्डी फाटा) याच्यासह दोन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. सहा दुचाकी मिळून एकूण एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शेख यांच्यासह गुन्हे शोधपथकाच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. (वार्ताहर)