११ जागांवर शासनाचा ताबा

By Admin | Updated: January 9, 2015 00:15 IST2015-01-09T00:09:42+5:302015-01-09T00:15:51+5:30

११ जागांवर शासनाचा ताबा

Governance of 11 seats | ११ जागांवर शासनाचा ताबा

११ जागांवर शासनाचा ताबा

 

शफीक शेख

मालेगाव
मालेगाव महापालिकेला शासनातर्फे आरक्षित असलेले ११ भूखंड राज्यशासनाने शहर विकासासाठी दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुरुवारी शासकीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यात सदर ११ जागांचा ताबा घेण्यात आला. या जागांवर शाळा, मैदान, बेघरांसाठी घरे बांधणे, पार्किंग, स्विमिंग पूल, दुकाने, दवाखाना, बगिचा करण्यासाठी त्यांचा महापालिकेला उपयोग होणार आहे. परिणामी मालेगावच्या सौंदर्यात भर पडणार असून, शहरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन या जागांची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केल्यानुसार शहरातील ११ जागा महापालिकेला मिळाल्या असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मनपा नगररचना विभागाने फौजफाट्यासह सदर जागांचा ताबा घेतला. आरक्षण क्रमांक ३१ नुसार सिटी सर्व्हे नं. १०९४ ही कॅम्पातील स्वातंत्र्यसैनिक नगरालगतची ०.४३० हेक्टर गावठाण जागेचा ताबा मनपाला मिळाला. यात प्राथमिक शाळा व खेळाचे मैदान यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. आरक्षण क्रमांक ३२ ही कॅम्पातील सिटी सर्व्हे नं. १०९४ स्वातंत्र्यसैनिक नगरालगतची गावठाण जागेचा ताबा मनपाने आज घेतला. त्यावर बेघरांसाठी घरे बांधण्यात येणार आहे. आरक्षण क्रमांक ३३ ही कॅम्पातील सिटी सर्व्हे क्रमांक १०३१ कॅम्पातील जागा खेळाच्या मैदानासाठी तर आरक्षण क्रमांक ३४ सिटी सर्व्हे नं. १५३४ ही जागादेखील खेळाच्या मैदानासाठी महापालिकेला मिळाली असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज ताबा घेण्यात आला. आरक्षण क्रमांक ४३/४४ ही सिटी सर्व्हे नं. १०७७ ही कॅम्पातील जागा पार्किंग तसेच दुकान केंद्रासाठी महापालिकेला मिळाली. आरक्षण क्रमांक ५१ नुसार सिटी सर्व्हे नं. ७२७ ही कॅम्पातील जागा बगिचासाठी महापालिकेला शासनाकडून देण्यात आली. आरक्षण क्रमांक ७४ सिटी सर्व्हे नं. ४८ ही कॅम्पातील जागा स्विमिंग पूल व बागांसाठी मिळाली असून, त्याचा ताबाही मनपाने घेतला.

Web Title: Governance of 11 seats