भरदुपारी आडगावला सोनसाखळी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 01:33 IST2022-03-02T01:32:42+5:302022-03-02T01:33:00+5:30
आडगाव शिवारातील धात्रक फाटा येथील राऊत मळ्यातून रस्त्याने घराकडे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली.

भरदुपारी आडगावला सोनसाखळी चोरी
पंचवटी : आडगाव शिवारातील धात्रक फाटा येथील राऊत मळ्यातून रस्त्याने घराकडे पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनसाखळी चोरी प्रकरणी मयूरेश अपार्टमेंट येथे राहणाऱ्या वर्षा विजय पाटील यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रविवारी (दि.२८) पाटील या दुपारी साडेबारा वाजता घराकडे पायी जात होत्या. यावेळी लाल रंगाच्या प्लसर दुचाकीने आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओरबाडून पलायन केले.