शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘गोदापार्क’ला पुराची झळ

By admin | Updated: July 15, 2016 01:22 IST

राज ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट : लोकार्पण लांबले अन् दौराही लांबला

 नाशिक : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘गोदापार्क’ नाशिककरांना अर्पण करण्याचा मुहूर्त काही लागेना. गेल्या रविवारी (दि.१०) गोदावरीला आलेल्या पुराची झळ बसल्याने गोदापार्कची पडझड झाली असून, विद्युत पोलसह हिरवळही वाहून गेली आहे. रिलायन्स फाउंडेशनमार्फत साकारलेल्या गोदापार्कच्या लोकार्पणाची तयारी पक्षपातळीवर सुरू असतानाच गोदापार्कवर नैसर्गिक आपत्ती कोसळल्याने शुक्रवार (दि.१५) पासून होणारा राज ठाकरे यांचा दौराही लांबला असून, त्यामुळे लोकार्पणही लांबले आहे. दरम्यान, पूररेषेत साकारलेला गोदापार्क पुन्हा एकदा त्यानिमित्ताने चर्चेत आला आहे.महापालिकेत सन २००२ मध्ये सेना-भाजपा युती सत्तारुढ झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपविली होती आणि त्यावेळी दर पंधरा दिवसांनी राज यांचा मुक्काम नाशिकला पडत होता. राज ठाकरे यांनी गोदावरी नदीकाठी सुशोभिकरणाचा प्रकल्प आराखडा तयार केला आणि गोदापार्क संकल्पना जन्माला आली. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सदर प्रकल्पाचा श्रीगणेशा करण्यात आला होता. गोदावरी नदीकाठी आसारामबापू पूल ते रामवाडी पुलापर्यंतचा सुमारे ९ कि.मी. गोदापार्क प्रकल्प साकारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु भूसंपादनात अनेक अडचणी येत गेल्या शिवाय राज यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर तर या प्रकल्पाकडे पूर्णत: दुर्लक्ष होत गेले. याशिवाय, सदर गोदापार्क हा पूररेषेत असल्याने त्याचे वारंवार येणाऱ्या पुरामुळे नुकसान होणार आहे त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपये पाण्यात जाणार असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. सन २०१२ च्या निवडणुकीत महापालिकेत मनसेने सत्ता संपादन केल्यानंतर राज यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ गोदापार्कला पुन्हा एकदा चालना मिळाली. यापूर्वी पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून साकारलेल्या गोदापार्कची वाताहत झाल्यानंतर राज यांनी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून आसारामबापू पुलाजवळील गोदाकाठी काही भाग विकसित करण्याचे ठरविले. सुरुवातीला ५०० मीटरचा गोदापार्क सुमारे ५० कोटी रुपये खर्च करून विकसित करण्याचा निर्णय झाला आणि दोन महिन्यांपूर्वीच गोदापार्कचे काम अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले. या गोदापार्कमध्ये हिरवळ लावण्याबरोबरच वॉक-वे, चिल्ड्रेन पार्क, आकर्षक विद्युत दीप आदि कामे पूर्णत्वाला आलेली होती. मार्च २०१७ मध्ये नाशिक महापालिकेची निवडणूक होणार असल्याने सत्ताधारी मनसेने राज यांचा प्रमुख प्रकल्प असलेल्या ‘गोदापार्क’च्या लोकार्पणाची तयारी चालविली होती. त्यासाठी राज यांचा दि. १५ ते १७ जुलै असा दौराही निश्चित झाल्याचे पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात होते. परंतु गेल्या रविवारी शहराला जोरदार पावसाने झोडपल्याने गोदावरीला मोठा पूर आला. त्याची झळ ‘ड्रीम प्रोजेक्ट’ गोदापार्कला बसून त्याची वाताहत झाली.