गोदावरी पेपर मिलच्या गोडाऊनला आग

By Admin | Updated: November 18, 2016 00:51 IST2016-11-18T00:51:16+5:302016-11-18T00:51:21+5:30

गोदावरी पेपर मिलच्या गोडाऊनला आग

Godavari paper mill godown fire | गोदावरी पेपर मिलच्या गोडाऊनला आग

गोदावरी पेपर मिलच्या गोडाऊनला आग


दिंडोरी : पेपर मिलच्या पुस्टा साठविलेल्या गोडाऊनला गुरूवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास आग लागली असून लाखो रु पयांचा कागद निर्मितीसाठी आणण्यात आलेल्या पुस्टा आगीत जाळला आहे. नुकसानीचा प्राथमिक अंदाज आलेला समजू शकला नाही.
आगीचे कारण समजले नसले तरी कंपनीच्या स्थापनेपासुनच्या वीस वर्षात या कंपनीच्या गोडाऊन ला आग लागण्याची हि तिसरी वेळ आहे . आग का लागते व कश्यामुळे लागती हया याबाबत सध्या उलट सुलट चर्चा होत आहे. आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल
होऊन आग विझविण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरु होते. मध्यतरीच्या काळात कंपनीच्या येणाऱ्या कच्या मालात तुकडे आडळले होते. तर कंपनीच्या सांडपाण्या मुळे शेतीच्या नुकसानीच्या अनेक तक्र ारी बरोबरच दुर्गंधीच्या समस्या अनेकदा नागरिकांनी केल्या मात्र आजपर्यंत कंपनीने सर्वच घटनाकडे सोयीचे दुर्लक्ष केल्याचेच दिसत आहे.

Web Title: Godavari paper mill godown fire