मैत्रिणीने दागिने चोरल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2016 00:52 IST2016-09-10T00:51:53+5:302016-09-10T00:52:04+5:30

मैत्रिणीने दागिने चोरल्याची तक्रार

Girlfriend complains of stolen jewelery | मैत्रिणीने दागिने चोरल्याची तक्रार

मैत्रिणीने दागिने चोरल्याची तक्रार


ओझरटाऊनशिप : येथील एका महिलेने घराच्या कपाटात ठेवलेले दहा तोळे ४ ग्रॅम वजनाचे २ लाख ७६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने नेहमी घरी येणाऱ्या मैत्रिणीने चोरून नेले असल्याची तक्रार नोंदविली आहे.
सुब्रा सलीला प्रुष्टी राहाणार टाइप टूबी/१८३७ या महिलेने दि. २१ आॅगस्ट रोजी १० तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (किंमत २ लाख ७६ हजार रुपये) एका पिशवीत घालून बेडरूममध्ये असलेल्या कपाटात ठेवले होते. दि. २७ आॅगस्ट रोजी त्यांनी कपाट उघडून बघितले असता कपाटात त्यांना दागिने नसल्याचे आढळून आले.
जवळचा घरोबा असलेली त्यांची मैत्रीण सिकरिती जितेन्द्रकुमार साहु समोरच राहायला असल्याने दि. २१ ते २७ आॅगस्टदरम्यान तिचे सतत घरात येणे-जाणे होते. तिनेच माझी नजर चुकवून दागिने चोरून नेले असल्याची तक्र ार सुब्रा सलीला या महिलेने ओझर पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. पोलिसांनी सिकरिती साहु या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश बोराडे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Girlfriend complains of stolen jewelery