शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

गीतरामायण म्हणजे चमत्कार

By admin | Updated: March 30, 2015 00:42 IST

अभय माणके : सावाना वार्षिक समारंभ उत्साहात

नाशिक : गीतरामायणाची निर्मिती होताना कोणत्याही कलाकृतीच्या निर्मितीत झाले नसतील एवढे चमत्कार अनुभवायला मिळाल्याने गीतरामायणाची निर्मिती म्हणजे निसर्गाचा चमत्कारच असल्याचे मत गायक अभय माणके यांनी व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित १७५ व्या वार्षिक समारंभात आयोजित गीतरामायणामागील रामायण या विषयावर ते बोलत होते. इंदूर येथील गायक अभय माणके व अमृता माणके यांनी आपल्या सुरेल आवाजात गीतरामायणातील गीत सादर करीत कार्यक्रमात रंग भरला. ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’, ‘दशरथा घे हे पायसदान’, ‘राम जन्मला गं सखे’ अशी गीते हिंदी आणि मराठीत सादर करीत उलगडलेले त्यामागील प्रसंग रसिकांची दाद घेऊन गेले. गीत सुरू असतानाच त्या गीताविषयीचे रंजक किस्सेही माणके यांनी कथन केले. सीताकांत लाड यांनी आकाशवाणीत रुजू होताना पहिल्याच दिवशी गीतरामायण कार्यक्रमाची योजना आखली. त्यानुसार त्यांनी गदिमा आणि सुधीर फडके यांना दूरध्वनीवरून त्या कार्यक्रमाची माहिती देत सुरुवातीला चारच गाणे तयार करण्याची विनंती केली;परंतु पहिल्याच गाण्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की त्यासाठी आलेल्या पत्रांनी तीन खोल्या भरल्या. हे पाहून मग हा कार्यक्रम वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी लागणाऱ्या कालावधीत सर्व कलावंतांच्या तसेच आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या. या कलाकृतीचे ऐकून ५७ भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. गदिमा यांनी यातील ५६ गीते ५६ रागांत रचून आणि फडके यांनी ते गाउन एक इतिहासच निर्माण केल्याचे माणके म्हणाले. याप्रसंगी त्यांनी गीतरामायणामागील अनेक घटना उलगडून सांगितल्या. यासाठी त्यांना सुभाष दसककर (संवादिनी), नितीन वारे (तबला), रवि सालके (की बोर्ड), अमित भालेराव (तालवाद्य) यांनी संगीतसाथ केली. जयप्रकाश जातेगावकर यांनी प्रास्तविक आणि सूत्रसंचालन केले. विलास औरंगाबादकर यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)