गजानन महाराज मार्गाची चाळणी

By Admin | Updated: July 31, 2014 00:59 IST2014-07-31T00:45:55+5:302014-07-31T00:59:08+5:30

गजानन महाराज मार्गाची चाळणी

Gazanan Maharaj road sidewalk | गजानन महाराज मार्गाची चाळणी

गजानन महाराज मार्गाची चाळणी

इंदिरानगर : येथील गजानन महाराज रस्त्याच्या रुंदीकरणातील मुरूम वाहून गेल्याने आणि खडी उखडून गेल्याने रस्त्याची चाळणी झाली आहे. तातडीने रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. गजानन महाराज रस्ता हा इंदिरानगरचा मुख्य व जुना रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यालगतच शास्त्रीनगर, सिद्धिविनायक सोसायटी, मोदकेश्वर सोसायटी, अरुणोदय सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनीसह विविध कॉलनी व सोसायट्या आहेत. त्यामुळे आणि राजीवनगर, चेतनानगर, पाथर्डीगाव, सार्थकनगरसह विविध उपनगरांस ये-जा करण्यासाठी जवळचा रस्ता असल्याने दिवसभर वाहनांची वर्दळ सुरू असते. परंतु काही दिवसांपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूने रुंदीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे खडीकरण करण्यात येऊन मुरूम टाकण्यात आला आहे. परंतु गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसाने गजानन महाराज मंदिर ते जॉगिंग ट्रॅकपर्यंतच्या रस्त्यावरील मुरूम वाहून गेल्याने लहान-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत, तर मोदकेश्वर चौक येथे केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकाम थातूर-मातूर पद्धतीने बुजविण्यात आले होते. त्यामुळे ते पावसाने उखडून गेल्याने खड्डा निर्माण झाला आहे. रस्त्यावर लहान-मोठ्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने अंदाज येत नसल्याने अपघातही घडत आहेत. तातडीने रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Gazanan Maharaj road sidewalk