गंगापूर धरणाचा साठा ९४ टक्क्यांवर दिवसभर पावसाची रिपरिप : गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 01:10 AM2021-09-12T01:10:15+5:302021-09-12T01:10:40+5:30

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी (दि.११) चांगलीच झड लावल्याने काही काळ जनजीवन अस्ताव्यस्त झाले. दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने तीन वाजता चांगलाच जोर धरला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात १२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असल्याने गंगापूर धरणाच्या साठ्यात वाढ झाली असून तो ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे.

Gangapur dam stocks at 94% rainfall throughout the day: water on the enthusiasm of Ganesh devotees | गंगापूर धरणाचा साठा ९४ टक्क्यांवर दिवसभर पावसाची रिपरिप : गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी

गंगापूर धरणाचा साठा ९४ टक्क्यांवर दिवसभर पावसाची रिपरिप : गणेश भक्तांच्या उत्साहावर पाणी

googlenewsNext

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारी (दि.११) चांगलीच झड लावल्याने काही काळ जनजीवन अस्ताव्यस्त झाले. दुपारी बारा वाजेपासून सुरू झालेल्या पावसाने तीन वाजता चांगलाच जोर धरला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत शहरात १२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून होत असल्याने गंगापूर धरणाच्या साठ्यात वाढ झाली असून तो ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस होत असताना नाशिकमध्ये मालेगावातील साकोरा तसेच नांदगाव आणि मनमाडमध्ये अतिवृष्टी झाली. नाशिक शहरात मात्र त्या तुलनेत कमी पाऊस असून रात्री किंवा सकाळी पावसाची रिपरिप सुरू असते आणि सायंकाळी पुन्हा पाऊस होतो. मात्र हे प्रमाण फार नाही. मात्र, गणेशोत्सव सुरू होऊन दुसरा दिवस सुरू होताच, पावसानेही आपली हजेरी कायम ठेवली. शुक्रवारी (दि.१०) सायंकाळी काही वेळ कोसळलेल्या पावसाने रात्रीतून अधून मधून हजेरी लावली. मात्र, शनिवारी पहाटेपासूनच शहर व परिसराला झोडपून काढले. सकाळी दोन तास विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला. सध्या गणेशोत्सव सुरू झाल्याने पावसाच्या संततधारेमुळे गणेश मंडळांची धावपळ उडाली. अनेकांनी मंडपाला प्लास्टिकची आच्छादने टाकली तर काही मंडळांच्या आरासवर ही त्याचा परिणाम झाला. गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर सार्वजनिक मंडळाचे देखावे पाहण्यासाठी नागरिक भ्रमंती करतात. शनिवार हा शासकीय सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी सायंकाळी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र सायंकाळनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बाजारपेठा ही लवकरच बंद झाल्या. पावसामुळे शहरातील मार्गावर पाणीच पाणी झाले आणि अनेक भागात नाले ही वाहू लागले आहेत.
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा वाढला असून तो आता ९४ टक्के इतका झाला आहे. नाशिककरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

धरणातून विसर्ग होण्याची शक्यता...
गंगापूर धरणातील साठा ९४ टक्के इतका असून रात्रीतून पाऊस झाल्यास त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्री पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणातून गोदापात्रात विसर्ग होण्याची शक्यता आहे.

Web Title: Gangapur dam stocks at 94% rainfall throughout the day: water on the enthusiasm of Ganesh devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.