शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

By admin | Updated: September 6, 2016 01:12 IST

नाशिकरोड परिसर : गुलालाची उधळण आणि वाद्यांच्या गजरात ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

नाशिकरोड : गणपती बाप्पा मोररया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत सार्वजनिक मंडळांनी व घरगुती श्रीगणरायाची स्थापना करण्यात आली. नाशिकरोड-उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५० सार्वजनिक छोट्या-मोठ्या मंडळांनी श्री गणरायाची स्थापना केली आहे.परिसरामध्ये सोमवारी सकाळ पासून संपूर्ण कुटुंब लाडक्या गणरायाला घेण्यासाठी मूर्ती विक्रीच्या स्टॉलवर दाखल झाले होते. बिटको चौकाजवळील जेलरोड येथे असलेल्या मूर्ती स्टॉलवर सकाळपासून सायंकाळपर्यंत भाविकांची मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. श्री गणरायाच्या आगमनाचे बाल-गोपाळांमध्ये मोठे आकर्षण असल्याचे चित्र सर्वत्र बघायला मिळत होते. घरातील मोठ्यांसोबत पारंपरिक वेशभुषेत आलेले बाल-गोपाळ गणपती बाप्पाचा जयघोष करत लाडक्या गणरायाला घेऊन जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. घराघरामध्ये मोठ्या भक्तिभावाने विधीवत गणरायाची स्थापना करण्यात आली. तर सोसायटी, कॉलनीतील मंडळांनीदेखील वाजत-गाजत गणरायाची स्थापना केली. जी फाउंडेशन, ओंकार मित्रमंडळ, ओम गुरूदेव मित्रमंडळ, श्री शनैश्चर मित्रमंडळ, मातोश्री फ्रेंड सर्कल, ईगल स्पोर्टस् अ‍ॅन्ड सोशल क्लब, अनुराधा फ्रेंड सर्कल, मनपा कर्मचारी गणेशोत्सव मंडळ, बालाजी सोशल फाऊंडेशन, व्यापारी बॅँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळ, वर्धमान मित्रमंडळ, श्री गणेश एकता कला-क्रीडा मंडळ, श्री सप्तशृंगी मित्रमंडळ, श्री महालक्ष्मी मित्रमंडळ, स्वराज्य मित्रमंडळ, श्री गजानन मित्रमंडळ, श्री म्हसोबा महाराज मित्रमंडळ, साईराज मित्रमंडळ, जय भद्रा मित्रमंडळ आदि सार्वजनिक छोट्या-मोठ्या मंडळांनी ढोल-ताशे व डिजेच्या गजरात मिरवणूक काढत श्री गणरायाची विधीवत स्थापना केली.