शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

वीज यंत्रणेचा खेळखंडोबा

By admin | Updated: March 2, 2015 00:04 IST

दुरुस्ती कामांची पोलखोल : विजेबरोबरच अभियंतेही गायब; ग्राहक झाले हैराण

नाशिक : देखभाल दुरुस्तीसाठी दर शनिवारी वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणने इतक्या दिवसांत काय ‘दिवे’ लावले आहेत याची पोलखोल किरकोळ पावसानेच केली आहे. थोड्याशा पावसानेही संपूर्ण शहरातील वीज यंत्रणा कोलमडून पडल्याने ग्राहकांना दोन दिवसांपासून अंधारात रहावे लागत असून, विजेबरोबरच अधिकारीही गायब असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहे. अवकाळी पावसामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागात तर कालपासून खंडित असलेला वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी दुपारी सुरू झाला, तर काही ठिकाणी वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. नेमका बिघाड कुठे आहे? वीज कधी येणार? याची कोणतीही माहिती ग्राहकांना मिळत नसल्याने विजेबरोबरच अधिकारीही गायब असल्याने महावितरणच्या या कारभाराविषयी ग्राहकांमध्ये तीव्र असंतोष आहे. शनिवारी शहर परिसरातील अनेक भागांतील फिडर्स नादुरुस्त होते, कुठे कंडक्टर बंद झाले, तर कुठे वाहिन्या तुटल्या. त्यामुळे तासंतास वीजपुरवठा गायब झालेला होता. अशा परिस्थितीत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी काय करतात याची माहिती सर्वसामान्यांना मिळणे कठीण झाल्याने अनेकांनी वर्तमानपत्रांच्या कार्यालयात चौकशी केली. प्रसारमाध्यमांसमोर काही अभियंते आले, मात्र शहरात कुठेही मोठा बिघाड नसल्याचा दावा त्यांनी केला व दहा तासांपेक्षा अधिक तास खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना झाला. शनिवारी महात्मानगर, सिडको, सातपूर, गंगापूररोड, अशोकस्तंभ, कॉलेजरोड, पाटीललेन या भागातील वीजपुरवठा खंडित असतानाही अभियंत्यांकडून इन्कार करण्यात येत होता. तसेच उंटवाडी, देवळाली कॅम्प, उपनगर, टाकळी, बिटको चौक, जैन भवन परिसर, आर्टिलरी सेंटर या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. जेलरोड,राजराजेश्वरी भागातही आठ तासापेक्षा अधिक काळ वीज गायब होती.