शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

जवान अर्जुन वाळुंजवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 22:58 IST

चांदवड : तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२८) याचे निधन झाले. अर्जुन याचे पार्थिव सैन्य दलाच्या नियमानुसार मूळ गावी भरवीर, तालुका चांदवड येथे मंगळवारी (दि. २२) सकाळी ९ वाजेच्या सुमारास आणण्यात आले. शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर भरवीर गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.

ठळक मुद्देभरवीर : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वाहिली पुष्पांजली

लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : तालुक्यातील भरवीर येथील सैन्य दलातील जवान अर्जुन प्रभाकर वाळुंज (२८) याचे निधन झाले. अर्जुन याचे पार्थिव सैन्य दलाच्या नियमानुसार मूळ गावी भरवीर, तालुका चांदवड येथे मंगळवारी (दि. २२) सकाळी ९ वाजेच्या सुमारास आणण्यात आले. शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, तर भरवीर गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली.अंत्ययात्रेस पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती. वीर जवान तुझे सलाम अशी मोठी रांगोळी काढली होती. जड अंत:करणाने या जवानालानिरोप देण्यात आला. भरवीर येथील त्यांच्या शेताजवळच अंत्यविधी करण्यात आला. आई राजूबाई, वडील प्रभाकर, पत्नी पूनम अर्जुन वाळुंज, लहान भाऊ सागर, विवाहित बहीण योगीता सुदर्शन जाधव यांनी जड अंत:करणाने त्याचे शेवटचे दर्शन घेतले. यावेळी पत्नी पूनम बेशुद्ध झाल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. यावेळी प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी पुष्पचक्र वाहिले.यावेळी मनमाड विभागाचे उपअधीक्षक साळवे, चांदवड पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, सैन्य दलातील अधिकारी, सैनिक, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ. राहुल आहेर, प्रहार संघटनेचे गणेश निंबाळकर, कॉँग्रेसच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव वक्टे, शांताराम ठाकरे, नितीन आहेर, का.भा. आहेर, भूषण कासलीवाल, राहुल शिरीषकुमार कोतवाल, सुनील अहेर, विलास ढोमसे, विजय जाधव, मुख्याध्यापक दादा अहिरे, नवनाथ आहेर यांची भाषणे झालीत. अशोक भोसले यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी चांदवड तालुक्यातील नातलग, सैनिक, राजकीय क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य