भरवस्तीत धाडसी चोरी

By Admin | Updated: September 20, 2014 00:35 IST2014-09-17T01:16:12+5:302014-09-20T00:35:24+5:30

भरवस्तीत धाडसी चोरी

Full brave theft | भरवस्तीत धाडसी चोरी

भरवस्तीत धाडसी चोरी

नाशिक : मालेगाव स्टॅण्डजवळच्या सीपी टॉवर या इमारतीतील सिगारेट व एफएमसीजी मालाचे वितरक वैश्य डिस्ट्रिब्यूटर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह सुमारे ३६ लाखांचा माल चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली़ चोरट्यांनी दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीचे नुकसान करून त्याचे रेकॉर्डिंगही खोलून नेण्याचा अनोखा फंडा वापरला असून, या घटनेमुळे व्यापारीवर्ग धास्तावला आहे़
मालेगाव स्टॅण्ड परिसरात असलेल्या मखमलाबाद रिक्षा स्टॅण्डजवळ सीपी टॉवर नावाची व्यावसायिक गाळे असलेली इमारत आहे़ या इमारतीत सुरेश नारायण वैश्य यांच्या मालकीचे वैश्य डिस्ट्रिब्यूटर्स नावाचे दुकान आहे़ या दुकानात ब्रिस्टॉल, गोल्ड फ्लेक, चारमिनार, फोर स्क्वेअर, विल्स, ५५५ यांसह विविध कंपन्यांच्या सिगारेट्सची होलसेल विक्री केली जाते़
सोमवारी रात्री वैश्य हे नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले़ मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी या दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केला़ त्यांनी कॅश काऊंटरमधील केबिनच्या गल्ल्यात ठेवलेले तीन लाख ८० हजार रुपये रोख, दुकानातील गुदामामध्ये असलेले विविध कंपन्यांच्या सिगारेट्सचे ३२ लाख रुपये किमतीचे ४० बॉक्स, कार्बन व सॅमसंग कंपनीचे दोन मोबाइल चोरट्यांनी चोरून नेले़ यानंतर चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करून रेकॉर्डिंगची हार्डडिस्कही चोरून नेली़

Web Title: Full brave theft