शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या पंपात वर्षभरानंतर येणार इंधन

By admin | Updated: September 5, 2014 00:33 IST

एसटीच्या पंपात वर्षभरानंतर येणार इंधन

 

नाशिक : अनुदानित इंधन बंद केल्यानंतर डिझेल भरण्यासाठी जाणाऱ्या महामंडळाच्या एसटी बसेस अनेक जिल्ह्यांत वादात सापडल्यानंतर अखेर शासन आणि परिवहन महामंडळाला सुबुद्धी सुचली असून, ४ तारखेपासून पुन्हा एसटीच्या पंपांमध्ये इंधन येणार असल्याची घोषणा महामंडळाच्या अध्यक्षांनी केली आहे. यासंदर्भात एसटीच्या अधिकृत संघटनेने वर्षभर मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला होता. गेल्या वर्षभरापूर्वी शासनाने अनुदानित इंधनाचा पुरवठा सर्वच शासकीय वाहनांना कमी केला होता. त्यानंतर वर्षभरात खासगी इंधनाच्या दरात झालेली वाढ पाहिल्यास शासनाच्या वतीने पुरविण्यात येणारे इंधन आणि बाजारातील इंधन यांचे दर जवळपास सारखाच झाला होता. तरीही शासन महामंडळाच्या बसेसला इंधन पुरवित नसल्याने राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसला विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यात पंपांवर रांग लावणे, त्यात प्रवाशांचा वेळ वाया जाणे, मिश्रित इंधनामुळे बसचा एव्हरेज कमी होणे, खासगी इंधन भरताना भ्रष्टाचार कमी होणे यांसारख्या अनेक समस्यांनी डोके वर काढले होते. त्यातच खासगी पेट्रोल पंपचालक कधीही संप करण्याची शक्यता गृहीत धरून अशा वेळेस प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून एसटीच्या पंपांवर इंधन येणे अत्यावश्यक होते. नुकत्याच न झालेल्या संपामुळे याची जाणीव झाल्याने अखेर महामंडळाने पंपांवर इंधन देण्याचा निर्णय जाहीर केला.आधीच तोट्यात चाललेल्या एसटीला नफ्यात आणण्यासाठी पंपावर इंधन पुरविणे हा एक मार्ग होता. त्यासाठी मान्यताप्राप्त संघटनेने वारंवार शासनाला आणि प्रशासनाला निवेदनेही दिली होती. त्यानंतर अखेर प्रशासनाने हा निर्णय जाहीर करून डेपोमधील पंपात इंधन पुरविण्याचा निर्णय जाहीर केला. (प्रतिनिधी)