एसटीच्या पंपात वर्षभरानंतर येणार इंधन

By Admin | Updated: September 5, 2014 00:33 IST2014-09-04T22:51:54+5:302014-09-05T00:33:00+5:30

एसटीच्या पंपात वर्षभरानंतर येणार इंधन

Fuel to come from ST pumps every year | एसटीच्या पंपात वर्षभरानंतर येणार इंधन

एसटीच्या पंपात वर्षभरानंतर येणार इंधन

 

नाशिक : अनुदानित इंधन बंद केल्यानंतर डिझेल भरण्यासाठी जाणाऱ्या महामंडळाच्या एसटी बसेस अनेक जिल्ह्यांत वादात सापडल्यानंतर अखेर शासन आणि परिवहन महामंडळाला सुबुद्धी सुचली असून, ४ तारखेपासून पुन्हा एसटीच्या पंपांमध्ये इंधन येणार असल्याची घोषणा महामंडळाच्या अध्यक्षांनी केली आहे.
यासंदर्भात एसटीच्या अधिकृत संघटनेने वर्षभर मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला होता. गेल्या वर्षभरापूर्वी शासनाने अनुदानित इंधनाचा पुरवठा सर्वच शासकीय वाहनांना कमी केला होता. त्यानंतर वर्षभरात खासगी इंधनाच्या दरात झालेली वाढ पाहिल्यास शासनाच्या वतीने पुरविण्यात येणारे इंधन आणि बाजारातील इंधन यांचे दर जवळपास सारखाच झाला होता. तरीही शासन महामंडळाच्या बसेसला इंधन पुरवित नसल्याने राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसला विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यात पंपांवर रांग लावणे, त्यात प्रवाशांचा वेळ वाया जाणे, मिश्रित इंधनामुळे बसचा एव्हरेज कमी होणे, खासगी इंधन भरताना भ्रष्टाचार कमी होणे यांसारख्या अनेक समस्यांनी डोके वर काढले होते. त्यातच खासगी पेट्रोल पंपचालक कधीही संप करण्याची शक्यता गृहीत धरून अशा वेळेस प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून एसटीच्या पंपांवर इंधन येणे अत्यावश्यक होते.
नुकत्याच न झालेल्या संपामुळे याची जाणीव झाल्याने अखेर महामंडळाने पंपांवर इंधन देण्याचा निर्णय जाहीर केला.
आधीच तोट्यात चाललेल्या एसटीला नफ्यात आणण्यासाठी पंपावर इंधन पुरविणे हा एक मार्ग होता. त्यासाठी मान्यताप्राप्त संघटनेने वारंवार शासनाला आणि प्रशासनाला निवेदनेही दिली होती. त्यानंतर अखेर प्रशासनाने हा निर्णय जाहीर करून डेपोमधील पंपात इंधन पुरविण्याचा निर्णय जाहीर केला. (प्रतिनिधी)

Web Title: Fuel to come from ST pumps every year